शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश प्रभू कोकणचा सन्मान

By admin | Updated: November 10, 2014 23:54 IST

निश्चितच राखतील : उपरकर

कणकवली : बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारखेच सुरेश प्रभू हे हुशार व्यक्तिमत्त्व आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना त्यांचे महत्त्व समजले नाही, अशी टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू यांच्या बुद्धीमत्तेचा कस ओळखून केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लावली आहे. आपल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून ते कोकणचा सन्मान निश्चितच राखतील, असा विश्वास मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केला.येथील संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, सुरेश प्रभू हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूत्र असून एक चांगले प्रशासकही आहेत. त्यामुळेच केंद्रीय रेल्वे मंत्रीपदी त्यांची नियुक्ती पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. कोकणाबरोबरच देशासाठी ते चांगले काम करू शकतात, हे त्यांच्या मागील राजकीय कारकिर्दीतून दिसून आले आहे. सुरेश प्रभूंचे कार्य जनतेला कळायला पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. कारण दूरदृष्टी ठेवून ते निर्णय घेत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूरध्वनी सेवा, विद्युतीकरण, बचतगटांच्या माध्यमातून महिलांबरोबरच पुरूषांचाही विकास साधणे असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर ज्या गाड्या थांबत नाहीत त्या गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील. तसेच रेल्वेसंबंधीचे प्रलंबित प्रश्नही ते सोडवतील. माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांच्यानंतर कोकणातील दुसरे रेल्वे मंत्री म्हणून भारताच्या नकाशावर सुरेश प्रभू यांचे नाव आता झळकणार आहे. त्यामुळेच पक्षभेद विसरून त्यांचे मनसेच्यावतीने आम्ही अभिनंदन करीत आहोत. (वार्ताहर)क्षमता ओळखून मोदींनी संधी दिली खासदार नसतानाही त्यांची क्षमता ओळखून मोदी शासनाने त्यांना मंत्रीपदी संधी दिली आहे. त्यांच्याबरोबर दूरध्वनीवर संपर्क केला असता ‘मला कोकणसाठी काहीतरी करायचे आहे. त्यादृष्टीने माझे निश्चितच प्रयत्न राहणार आहेत’ असे अभिवचन प्रभू यांनी दिले असल्याचेही उपरकर यांनी यावेळी सांगितले.