शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

गोवा-पत्रादेवी तपासणी नाक्यावर पोलिसांकडून कडक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 17:50 IST

CoronaVirus Goa Border Sindhudurg : गोवा-महाराष्ट्र सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या युवक-युवतींना कोरोना निगेटिव्ह दाखल्याची बुधवारपासून सक्ती करण्यात आली होती. गुरुवारपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव‍ा राज्य सरकारकडून कडक निर्बंध करण्यात आले. कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास गोव्यात प्रवेश देण्यात येत होता. गोवा तपासणी नाक्यावर सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वांची कडक तपासणी करून प्रवेश देण्यात येत होते.

ठळक मुद्देगोवा-पत्रादेवी तपासणी नाक्यावर पोलिसांकडून कडक तपासणीगोव्यात ये-जा करणारी वाहतूक काही वेळ बंद

बांदा : गोवा-महाराष्ट्र सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या युवक-युवतींना कोरोना निगेटिव्ह दाखल्याची बुधवारपासून सक्ती करण्यात आली होती. गुरुवारपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव‍ा राज्य सरकारकडून कडक निर्बंध करण्यात आले. कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास गोव्यात प्रवेश देण्यात येत होता. गोवा तपासणी नाक्यावर सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वांची कडक तपासणी करून प्रवेश देण्यात येत होते.सकाळच्या वेळी सिंधुदुर्गमधून नोकरी-धंद्यासाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तपासणीसाठी वेळ लागत होता. यामुळे गोवा तपासणी नाक्यावर गर्दी दिसून आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास १५ हजार युवक-युवती गोव्यामध्ये नोकरीसाठी जातात. यापूर्वी या युवक-युवतींच्या जाण्या-येण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी महाराष्ट्र-गोवा यांनी यावर तोडगा काढून त्यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग मोकळा केला होता.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अचानक तपासणी सुरू केल्याने गोवा तपासणी नाक्यावर सकाळच्या वेळी गर्दी व वाहनांची वर्दळ दिसून आली. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची गळचेपी केली जात आहे. बाहेर‌ पडल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. आज आर्थिक परिस्थिती ठासळल्याने लोकांचा चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोक दंड कोठून भरणार, हे असंच चालू राहिल्यास कोरोना हद्दपार होईल काय? नाही. गतवर्षीप्रमाणे हीच परिस्थिती राहिली तर? असे प्रश्न नोकरदार, छोट्या उद्योग व सामान्य नागरिकांना पडले आहेत. कोविशिल्ड लस घेतलेले प्रमाणपत्र, ई-पास, कोरोना रॅपिड टेस्ट रिपोर्ट असणाऱ्या नोकरदार युवक-युवतींना गुरुवारी प्रवेश दिल्याचे गोवा पोलिसांकडून सांगण्यात आले.गोव्यात ये-जा करणारी वाहतूक काही वेळ बंदगुरुवारी सकाळी कोरोना निगेटिव्ह अहवाल तपासणी सुरू केल्यानंतर प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे गोव्यात जाणाऱ्या नोकरदार वर्गाने महाराष्ट्र हद्दीत गोव्यात जाणारी व गोव्यातून येणारी वाहतूक काही वेळी बंद होती. डंपर व इतर माल वाहतूक खुलेआम सुरू असल्याने युवक-युवती आक्रमक झाले होते. सकाळच्या वेळी दोन्ही बाजूने ट्राफिक जाम झाले आहे. दुपारनंतर गोव्या तपासणी नाक्यावर वाहनांची व प्रवाशांची तुरळक गर्दी होती. कोरोना अहवाल तपासणी करून प्रवेश देण्यात येत होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbanda-pcबांदाsindhudurgसिंधुदुर्ग