शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत डॉक्टरांअभावी रूग्णांचे हाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती : ग्रामस्थ आक्रमक, तीव्र आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत

By admin | Updated: May 10, 2014 00:01 IST

महादेव भिसे ल्ल आंबोली आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला महिनाभर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना मानसिक,

महादेव भिसे ल्ल आंबोली आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला महिनाभर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेचा व प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून येत्या आठ दिवसात तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. आठ दिवसांपूर्वी आंबोली ग्रामस्थांकरवी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिकेवर चालक नेमणुकीसाठी उपोषण करण्यात आले होते. परंतु या उपोषणाचीे कोणतीही दखल वैद्यकीय अधिकार्‍यांकडून घेण्यात आली नाही. याउलट तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केलेले मळेवाडचे डॉक्टर करीबळे यांनी उपोषणाच्या दुसर्‍या दिवशीच रजा टाकून पळ काढला. त्यामुळे इथल्या रुग्णांचे आणखी हाल होत आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंबोलीतील भर बाजारपेठेत एक २६ वर्षीय विवाहीत महिला पूजा प्रवीण राऊत (कुडाळ- वालावल) या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे वैद्यकीय अधिकारीच नसल्याने परिचारिकेने त्या महिलेवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी सावंतवाडी येथे जाण्यास सांगितले. याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या जिल्हाधिकार्‍यांसोबत मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले. तर सरपंचांना सामान्यांच्या या हेळसांडीबाबत काही तोडगा काढणार का, असे विचारल्यास जनतेच्या प्रश्नांबाबत काहीच देणेघेणे नसल्याप्रमाणे ते उलट उत्तरे देतात. सरपंचांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य आत्माराम पालेकर हे रुग्ण कल्याण नियामक समितीचे अध्यक्ष आहेत. परंतु त्यांना तर आरोग्य केंद्राच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळच नसल्याचे दिसून येत आहे. पंचायत समिती सदस्या रोहिणी गावडे यांचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. तर आमदारांकडून केवळ आश्वासनेच मिळतात, असे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे मत आहे. आंबोलीत येणार्‍या चांगल्या डॉक्टर्सना येथील काही राजकारणी मानपानावरून बदली करवून घालवून देत असल्याचे समोर आले आहे. एकंदरीत डी. एच. मोरे यांच्या गलथान कारभारामुळे आंबोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र मृत्यूशय्येवर आहे. या प्राथमिक कें द्रावर अवलंबून असलेल्या चौकुळ, गेळे या गावातील रुग्णांना आता केवळ देवच वाली उरला आहे. तब्बल १८ कर्मचारी आणि एकही डॉक्टर नाही, अशी भयानक अवस्था आरोग्य केंद्राची असून पाच लाखापेक्षा जास्त वेतन निधी शासन या आरोग्य केंद्रावर अक्षरश: वाया घालवित आहे. चार उपकेंद्रांच्या प्रमुख असलेल्या आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला आता वाली कोण? असा प्रश्न यामुळे जनतेला पडला आहे.