शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली चकाचक मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: September 23, 2014 00:16 IST

२५0 स्वयंसेवकांचा सहभाग : गोळा केला तब्बल १६0 गोणी कचरा

आंबोली : आंबोलीत शनिवार ते रविवार या कालावधीत आंबोली चकाचक ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्हाभरातील सुमारे अडिचशे स्वयंसेवकांनी सहभाग दर्शवित आंबोलीतील पंधरा किलोमीटर परिसरातील १६0 गोणी कचरा गोळा केला. पर्यटन स्थळांच्या विकासाबरोबर त्यांच्या देखभालीकडेही लक्ष देणे, गरजेचे असल्याचा संदेश देण्यासाठीच आंबोलीतील नागरिकांनी ही मोहिम राबविली.आंबोली पर्यटनदृष्ट्या जसजसे नावारुपास येत आहे, तसेच या ठिकाणी वाढणाऱ्या कचऱ्यामुळे बकालही होत आहे. गेली अनेक वर्षे इथल्या पर्यटन स्थळांची कधीच स्वच्छता करण्यात आली नव्हती. परंतु आंबोलीतील काही तरुणांनी एकत्र येऊन मलबार निसर्ग संवर्धन संस्था व होय महाराजा ग्रामीण पर्यटन संस्थेच्या माध्यमातून आंबोलीतील सर्वच्या सर्व पर्यटन स्थळे वर्षभर स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे. या कामी त्यांना हॉटेल ग्रीन व्हॅली, आंबोली पब्लिक स्कूल, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचर क्लब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आंबोलीत शनिवार, रविवारी महादेव गडपॉर्इंट, शिरगावकर पॉर्इंट, तसेच पूर्वेचा वस मदिर ते मुख्य धबधबा या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. सिंधुदुर्गातील तब्बल अडीचशे स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी ‘आंबोली चकाचक’ ही स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी आंबोलीच्या पंधरा ते सोळा किमीच्या परिसरात तब्बल १६० गोणी भरतील, एवढा प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करण्यात आला व त्याची विल्हेवाट लावण्यात आली. मलबार निसर्ग संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी अशा मोहिमा हाती घेण्यात येतील, असे सांगत संस्थाध्यक्ष काका भिसे यांनी उपस्थित स्वयंसेवक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी आंबोली पब्लिक स्कूलचे प्राचार्य विलास मोरे, सैनिक स्कूलचे प्राचार्य सुरेश गावडे यांचे सहकार्य लाभले. स्वच्छता मोहिमेदरम्यान मुलांना संस्थेमार्फ त कचरा उचलण्याची काठी व हातमोजे पुरविण्यात आले होते. आंबोलीत वेळोवेळी होणाऱ्या समाजोपयोगी कामांमध्ये जिल्ह्यातील कुठल्याही संस्थेला वा व्यक्तीला सहकार्य करायचे असल्यास त्यांनी काका भिसे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थासचिव राजेश केळूसकर यांनी केले आहे. मोहिमेत सहभागी शाळांना विजयकुमार सावंत यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. (वार्ताहर)