शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

Anganewadi Jatra 2026: आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार, आजपासून आरक्षणास सुरुवात; गाड्यांचे वेळापत्रक..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:45 IST

मुंबई-मडगावदरम्यान धावणार जादा गाड्या : ४ फेब्रुवारीपासून आरक्षणाला सुरुवात; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Anganewadi Jatra 2026 Special Trains:कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेसाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची आणि भाविकांची गर्दी आता रेल्वेच्या रूळावर धावणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगावदरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी या विशेष गाड्यांच्या नियोजनाची माहिती दिली.

असे असेल विशेष गाड्यांचे वेळापत्रक

गाडी क्रमांक ०१००४ मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दि. ७ आणि ९ फेब्रुवारी रोजी मडगाव येथून दुपारी ४:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:५० वाजता मुंबईत पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव विशेष गाडी दि. ८ आणि १० फेब्रुवारी रोजी सकाळी ७:५५ वाजता मुंबईहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०:०० वाजता मडगावला पोहोचेल.

आरक्षणासाठी उडाली झुंबड

या विशेष गाड्यांचे बुकिंग ४ फेब्रुवारी २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. या गाडीला एकूण २२ डबे असून, प्रवाशांच्या सोयीसाठी २० स्लीपर डबे जोडण्यात आले आहेत. आंगणेवाडी यात्रेच्या काळात नियमित गाड्यांचे आरक्षण महिनाभरापूर्वीच फुल झाल्याने, या विशेष गाड्यांमुळे हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचा : ‘आंगणेवाडी’ सजली; बाजारपेठ फुलली, देवीच्या दर्शनासाठी यंदा खास नियोजन

प्रवासाचा मार्ग आणि प्रमुख थांबे

मुंबई ते मडगावदरम्यान धावणाऱ्या या गाड्यांना कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा : सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग स्थानक, कणकवली, वैभववाडी रोड.
इतर प्रमुख थांबे : राजापूर रोड, रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगाव, पनवेल आणि ठाणे.

एका नजरेत रेल्वे फेऱ्या (फेब्रुवारी २०२६)

गाडी क्रमांक - कुठून-कुठे- तारीख - वेळ

०१००४ - मडगाव ते मुंबई - ७ व ९ फेब्रु. - दु. ४:३० वा.
०१००३ - मुंबई ते मडगाव - ८ व १० फेब्रु. - स. ७:५५ वा.
नोंद बुकिंग ४ फेब्रुवारीपासून सुरू 

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडी भराडीदेवी जत्राsindhudurgसिंधुदुर्गKonkan Railwayकोकण रेल्वेkonkanकोकणIndian Festivalsभारतीय उत्सव-सण