शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांचा 'खेळ खल्लास', प्रशासनाचा 'सर्जिकल स्ट्राईक' खास; रात्रभर चाललेल्या मोहिमेत १५ वाहने जप्त

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 18, 2026 14:24 IST

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचा दणका

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वयाची भूमिका बजावत एका अत्यंत नियोजित 'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विशेष धोरण आखले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना समन्वयाने कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. यात सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे सूर्यकांत पाटील, कणकवलीचे दीक्षात देशपांडे, मालवणचे गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे ओंकार ओतारी आणि कुडाळचे सचिन पाटील यांच्या पथकांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अत्यंत गुप्तपणे ही मोहीम राबवली.

मोहिमेची व्याप्ती इतकी मोठी होती की, जिल्हा प्रशासनाने सर्व मार्गांवर एकाच वेळी धडक दिली. रात्री उशिरापर्यंत, अगदी पहाटे ३ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपली वाहने आणि वाळू वाटेतच सोडून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः झाराप परिसरात उपस्थित राहून या संपूर्ण मोहिमेचा आढावा घेतला. या कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून, ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात जमा करण्यात आली आहेत.

प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला मोठा आळा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही कारवाई आता जिल्ह्यासाठी एक 'रोल मॉडेल' ठरली आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या संयुक्त आणि गुप्त कारवाया सातत्याने राबवून कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्याचा ठाम संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.चौकट

कारवाईचा आकडा: १५ वाहने जप्तविविध तालुक्यांतील संयुक्त पथकांनी केलेल्या कारवाईत: आचरा-कणकवली मार्ग (२), देवली-परुळे (३), कुंभारमाठ (३), तोंडवली (३) आणि कुडाळ परिसर (४) अशा एकूण १५ वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

समन्वयाची ताकद

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सहा तहसीलदारांच्या पथकांनी (सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली, मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळ) अभूतपूर्व समन्वय साधत ही मोहीम यशस्वी केली.चौकट

मोहिमेची गोपनीयता'सर्जिकल स्ट्राईक'च्या धर्तीवर या मोहिमेत कमालीची गुप्तता पाळली होती. रात्रीच्या वेळी एकाच वेळी अनेक ठिकाणी धडक दिल्याने वाळू तस्करांना सावरण्याची संधी मिळाली नाही. अनेक ठिकाणी वाहने सोडून आरोपींनी पळ काढला.

प्रशासनाचा स्पष्ट इशारा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः झाराप येथे भेट देऊन आढावा घेतला. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध आता 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबले जाणार असून, यापुढेही अशा प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg Admin's 'Surgical Strike' Nets 15 Vehicles in Sand Mafia Crackdown

Web Summary : Sindhudurg administration launched a 'surgical strike' against illegal sand mining, seizing 15 vehicles. The coordinated operation, led by the District Collector, involved multiple tehsildars and aimed to curb illegal sand extraction and transportation. More such actions are promised.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गsandवाळू