सिंधुदुर्ग, कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांत घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 14:22 IST2022-05-07T14:15:16+5:302022-05-07T14:22:03+5:30
कणकवली : सिंधुदुर्गात चोरांचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. त्याअनुषंगाने पोलिसांची गस्तही सुरू आहे. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे ...

सिंधुदुर्ग, कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांत घबराट
कणकवली : सिंधुदुर्गात चोरांचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. त्याअनुषंगाने पोलिसांची गस्तही सुरू आहे. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे चित्र आहे. काल, शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी कणकवली शहरालगत असलेल्या कलमठ महाजनीनगर येथील बंद बंगले फोडले आहेत. मात्र, याघटनेत चोरट्यानी किती ऐवज लंपास केला हे समजू शकलेले नाही. पोलीस तपास करीत आहेत.
कलमठ महाजनीनगर येथील शिवाजी सातपुते, बी. बी. जाधवर यांची गेले काही दिवस बंद असलेली घरे लक्ष्य करीत चोरट्यांनी फोडली आहेत. एका निवृत्त पोलिसाचा बंगलाही फोडल्याची बाब समोर आली आहे. याआधी चोरांनी दुकानांना लक्ष्य केले होते. पोलीस यंत्रणा या चोरांचा माग लावण्यात अपयशी ठरत आहे.
साध्या कुलुपसह लॅच लॉक असलेले बंगलेही चोरांनी फोडल्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. कणकवली पोलीस चोरीच्या या घटनेची अधिक माहिती घेत आहेत. काही घरमालक बाहेरगावी गेलेले असल्याने पोलिसांना माहिती मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे.