केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध : राऊत

By Admin | Updated: August 26, 2015 00:07 IST2015-08-26T00:07:02+5:302015-08-26T00:07:02+5:30

कोकणात उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीवर उद्योग व्यवसाय उभारावेत, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे व ती कायम राहील.

Shiv Sena's opposition to chemical zone: Raut | केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध : राऊत

केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध : राऊत

रत्नागिरी : कोकणचा विकास करायचा आहे, वाळवंट करायचे नाही. कोकणासाठी पर्यटन आराखडा मंजूर करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी जर कोकणात केमिकल झोन उभारण्याचा निर्णय घेतला, तर शिवसेना त्याला कडाडून विरोध करेल, अशी आक्रमक भूमिका शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी घेतली. कोकणात उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीवर उद्योग व्यवसाय उभारावेत, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे व ती कायम राहील. त्यामुळे शिवसेना कोकणात केमिकल झोन कदापि स्वीकारणार नाही. त्याला कडाडून विरोध केला जाईल, असा घरचा आहेर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
रत्नागिरीतील विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणामध्ये केमिकल झोन आणण्याची नागपूरमध्ये घोषणा केली होती. या घोषणेचा त्यांनी समाचार घेतला.
केमिकल झोनला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या झेंड्याखाली रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी एकत्र येऊ. त्यासाठी इतर पक्षांची मदत घेण्याची गरज नसल्याचे राऊत यांनी सांगितले.
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असल्याचा आरोप माजी खासदार नीलेश राणे यांनी केला होता.

Web Title: Shiv Sena's opposition to chemical zone: Raut