शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दर्शनासाठी यावर्षी सातवी रांग

By admin | Updated: January 14, 2015 00:28 IST

आंगणेवाडी यात्रा नियोजन : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा

मालवण : दर्शन व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी दरवर्षीच्या सहा रांगांबरोबरच एका जादा रांगेची व्यवस्था करून एकूण सात रांगांची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे यांनी दिली.काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आंगणेवाडी श्री भराडीदेवी यात्रोत्सवाच्या नियोजनाच्या बैठकीस जिल्हा प्रशासनाला वेळ मिळत नसताना मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी आंगणेवाडी येथे बैठक घेऊन आंगणेवाडी ग्रामस्थांकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती घेतली.तसेच यात्रेदरम्यान पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षा यंत्रणेबाबत व गर्दीवर नियंत्रण मिळविण्याच्यादृष्टीने मंदिर परिसराची पाहणी करून आढावा घेतला. तसेच याबाबत पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचनादेखील केल्या. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांच्यासमवेत मालवणचे पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, पोलीस राणे, जोशी, तसेच नरेश आंगणे, सतीश आंगणे, चंद्रकांत आंगणे, सचिन आंगणे, विठ्ठल आंगणे आदी उपस्थित होते. मंदिरालगतच्या परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे दर्शन व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे फेरीवाल्यांना अटकाव करावा, अशी मागणी नरेश आंगणे यांनी केली. तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूकडील रस्ते व भोगलेवाडी तिठा ते मंदिर हा रस्ता खराब झाला असून त्याच्या दुरूस्तीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावी. त्याचप्रमाणे यात्रा नियोजनाचा अद्ययावत आराखडा लवकरच प्रशासनाला सुपूर्द करू, असे आंगणे यांनी सांगितले. महसूल विभागाचे तालुका आणि जिल्हा प्रशासन आंगणेवाडी यात्रा नियोजनाबाबत दरवर्षी तीन ते चार बैठका ग्रामस्थांसमवेत घेते. मात्र, यावर्षी अद्यापही प्रशासनाने एकही बैठक घेतलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दिरंगाईबाबत ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)मंदिर परिसरात एकूण आठ मंडपमंदिर परिसरात हिरवे कारपेटयात्रेदरम्यान होणारा धुळीचा त्रास कमी करण्यासाठी मंदिर परिसरातील मंडपांमध्ये हिरवे कारपेट पसरविण्यात येणार आहे. मंदिरालगतचा सुमारे ५०० मीटरपर्यंतचा परिसर कारपेटने आच्छादित करण्यात येणार आहे.आपत्कालिन परिस्थितीत मंदिराच्या दोन्ही बाजूच्या मंडपांमध्ये सुमारे एक हजार भाविक सामावू शकतील, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. जेणेकरून अशावेळी गर्दीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, अशी माहिती नरेश आंगणे यांनी दिली.दरवर्षी दर्शनासाठी सहा रांगा असतात. मात्र यावर्षी आणखी एका जादा दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात येणार आहे. दर्शन व्यवस्थेवरील ताण कमी व्हावा, तसेच मंदिराशेजारील परिसरात गर्दी कमी करण्यासाठी व कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी अतिरिक्त दर्शन रांग निर्माण करण्यात येणार आहे.- नरेश आंगणे,ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष, आंगणेवाडीमंदिर परिसराची आपण आज पाहणी केली आहे. आंगणेवाडीची यात्रा दक्षिण कोकणातील सर्वात मोठी यात्रा असल्याने यात्रेदरम्यान उसळणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस यंत्रणेचे राखीव पथक तैनात करण्यात येणार आहे.- विजय खरात,उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवलीगेल्यावर्षी यात्रेदिवशी रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत मंदिर परिसरात अचानक गर्दी वाढल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली होती. त्यामुळे यावेळी दर्शनाच्या रांगांमध्ये व दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करावा. जेणेकरून गेल्यावर्षीची चूक टाळता येणे सहज शक्य होईल- विश्वजीत बुलबुलेपोलीस निरीक्षक, मालवण