शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

साखरोळीतील घटना : एक गंभीर, दोघे जखमी; मध्यरात्री भयाचे तांडव; तलवारीसह अन्य शस्त्रांचा वापर

By admin | Updated: July 22, 2014 23:57 IST

कुटुंबाच्या हल्ल्यात एक ठार

दापोली : अख्खे घर साखरझोपेत असताना हातात तलवारी, कुऱ्हाड, कोयता व चॉपर घेऊन घराच्या मागचा दरवाजा तोडून आत शिरलेल्या चार महिलांसह तीन तरुणांनी आपल्या चुलत्याचा पाठलाग करून निर्घृण खून केला. एवढेच नव्हे, तर इतर तिघाजणांना जखमी केले आहे. त्यातील एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे. आज, मंगळवारी पहाटे दोन वाजता तालुक्यातील साखरोळी येथे ही घटना घडली. प्रथमदर्शनी हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाले असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामागे भगतगिरी कारणीभूत असण्याची शक्यता अधिक आहे.साखरोळी नं. १ येथील हनुमानवाडीत रमेश पांडुरंग मिसाळ, त्यांची पत्नी ऋचिता रमेश मिसाळ, मुलगा रूपेश, सून प्रणया, दुसरा मुलगा प्रफुल्ल व नातू वेदांत आपल्या घरात गाढ झोपले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागच्या दारावर जोरदार लाथांचा तसेच शिव्यांचा आरडाओरडा ऐकायला येऊ लागला. काहीतरी विपरीत घडणार असे वाटत असतानाच मागचा दरवाजा तोडून सचिन संतोष मिसाळ, किरण संतोष मिसाळ, महेश शंकर मिसाळ, मीनाक्षी महेश मिसाळ, राधिका सचिन मिसाळ, सुनंदा संतोष मिसाळ व योगिता संतोष मिसाळ या सातजणांचा घोळका घरात शिरला. त्यांच्या हातात तलवार, कुऱ्हाड, चॉपर, कोयता यासारखी हत्यारे होती.या सातजणांनी समोर दिसेल त्याच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. त्यातील संशयित आरोपी सचिन मिसाळ (वय २२) याच्या हातात धारदार तलवार होती. त्या तलवारीने त्याने प्रथम रमेश मिसाळ या ५५ वर्षीय वृद्धावर जोरदार प्रहार केला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रूपेशच्याही पोटात तलवार खुपसण्यात आली.घरात जोरात आकांत चालू असताना जो तो घराबाहेर पडण्यासाठी समोरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. घरातील कोणीही बाहेर पळून जाऊ नये म्हणून सचिन व त्याच्या सहकाऱ्यांनी मुख्य दरवाजाला आधीच बाहेरून कडी घातली होती.मृत्यू बनून आलेल्या त्या सातजणांच्या टोळक्याने हाणामारी व हातातील शस्त्राने वार चालूच ठेवले होते. जीव वाचविण्यासाठी रमेश व रूपेश या बापलेकांनी खिडकीतून घराबाहेर उड्या टाकल्या. याचवेळी सचिन, महेश व किरण हे हातातील शस्त्रे घेऊन घराबाहेर आले. सचिनने पाठलाग करून रमेश मिसाळ यांच्यावर पुन्हा जोरदार हल्ला चढविला. त्यांच्या पोटात, पाठीवर, मानेवर, छातीवर जोरदार प्रहार केले. रमेश मिसाळ घरापासून तब्बल २०० फूट पळत गेले. मात्र, शरीरावर तब्बल १९ वार झाले असल्याने ते घरापासून २०० फुटांवर जाऊन (पान ७ वर)प्रणयाने मुलासाठीवार हातावर झेलला...अंगात संशयाचे भूत संचारलेले आरोपी हाणामारी करीत असताना घरात अक्षरश: हलकल्लोळ माजला होता. मिसाळांच्या वंशाचा दिवाही विझवा, असे म्हणत सचिनने तलवार बाहेर काढली. त्या तलवारीने साडेतीन वर्षीय वेदांतवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची आई प्रणयाने सचिनच्या हातातील तलवारीचा वार आपल्या हातावर झेलला आणि जोराचा झटका दिला. त्यात तिचे एक बोट तुटले. मात्र, तिने दाखविलेल्या या धाडसीपणामुळे तिचा मुलगा वेदांत वाचला.दोघे जखमी, एक गंभीरया एकूणच प्रकारात रूपेश आणि प्रफुल्ल यांना मोठ्या जखमा झाल्या आहेत. पोटावर तलवारीचा मोठा वार झाल्याने रूपेशची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातील इतर लोकांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत.जमिनीचा वाद हे मुख्य कारण असले, तरी मृत रमेश मिसाळ हे भगतगिरी करतात आणि त्यामुळे सचिन व किरणचे वडील संतोष यांचा मृत्यू झाल्याचा संशय आरोपींना होता. त्यातूनच हे हत्याकांड झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी दिली. याप्रकरणी सचिन मिसाळ, किरण मिसाळ, महेश मिसाळ, मीनाक्षी मिसाळ, राधिका मिसाळ, सुनंदा मिसाळ, योगिता मिसाळ या सातजणांविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०६, ३२४, ४५१, ५०६, ५०४, १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.