सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 04:18 PM2020-11-09T16:18:36+5:302020-11-09T16:20:44+5:30

ncp, jayantpatil, sindhududurg राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी खारेपाटण येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. बऱ्याच कालावधीनंतर राष्ट्रवादीचे नेते जिल्ह्यात दाखल झाले. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Revival in NCP in Sindhudurg! | सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य !

खारेपाटण येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देखारेपाटण येथे जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत निवेदन देण्यासह भावना व्यक्त

कणकवली/ खारेपाटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी खारेपाटण येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. बऱ्याच कालावधीनंतर राष्ट्रवादीचे नेते जिल्ह्यात दाखल झाले. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, काका कुडाळकर आणि जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकारी उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जयंत पाटील यांचे स्वागत केले. 

कणकवली येथे राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, तालुकाध्यक्ष राजू पावसकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, सुंदर पारकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, सुधाकर कर्ले, तालुका उपाध्यक्ष मंगेश दळवी, राजेश पाताडे, इम्रान शेख, दिलीप वर्णे, अमित केतकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सावळाराम अणावकर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बांधणी करीत असताना आता राज्य पातळीवर त्याला चांगला पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा दौरा झाला होता.

नांदगाव तिठा येथे अल्पसंख्याक सेलच्यावतीने स्वागत

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नांदगाव तिठा येथे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आसिफ बटवाले, मुजफ्फर बटवाले, रफिक जेठी, अब्दुल नावलेकर, आलिम बटवाले, शाहरूख बोबडे, मोसिम बटवाले, अब्दुल पाटणकर, अरमान बटवाले, अरबाज बटवाले रमजान नावलेकर आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नळयोजनेचे काम पूर्ण करा : राऊत

खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. खारेपाटण येथील अर्धवट स्थितीत असलेली मुखमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत मंजूर झालेल्या खारेपाटण नळयोजनेबाबत लेखी निवेदन दिले. खारेपाटण नळयोजनेचे अपूर्ण काम ठेकेदारावर कारवाई करून पूर्ण करून देण्याबाबत राऊत यांनी मंत्री पाटील यांच्याकडे विनंती केली.

 

Web Title: Revival in NCP in Sindhudurg!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.