शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी ‘कास्ट्राईब’चे अनुसूचित जाती समितीला निवेदन

By admin | Updated: August 26, 2015 22:58 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण समितीमध्ये इतर संघटनप्रमाणे मागासवर्गीय समितीचा प्रतिनिधी घेण्यात यावा

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्गच्यावतीने अनुसूचित जाती-जमाती कल्याण समितीची भेट घेऊन विविध मागण्यांविषयी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेनंतर संघटनेच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेऊन न्याय देण्याचे आश्वासन समितीचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी दिले. यावेळी संघटनेच्यावतीने सुरेश खाडये यांच्यासह भाई गिरकर, हरीश पिंपळे, रमेश बुंदिले, प्रकाश गजभिये, जोगेंद्र कवाडे आदी आमदारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रमसाफल्य घरकुल योजनेंतर्गत नगर पालिकेतील पंचवीस वर्षे सेवा झालेल्या सफाई कामगारांना मोफत घरकुल योजनेचा आदेश लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, मोफत घरकुल योजनेची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती समितीकडून देण्यात आली. कास्ट्राईब संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनातून समाज कल्याण विभागामार्फत कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्या समितीमध्ये कास्ट्राईब कर्मचारी कल्याण समितीचा एक प्रतिनिधी घेण्यात यावा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण समितीमध्ये इतर संघटनप्रमाणे मागासवर्गीय समितीचा प्रतिनिधी घेण्यात यावा, समाज कल्याण विभागामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुलांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम मुलांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, मुख्यालयी राहत असूनही मागासवर्गीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे घरभाडे दिले जात नाही, हा कर्मचारी वर्गावर होणारा अन्याय दूर करावा, माध्यमिक शाळांमध्ये अनशेषाची पदे त्वरित भरण्यात यावीत, जातपडताळणी कार्यालय जिल्ह्यात सुरू करण्यात आले असूनही कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आलेली नाही, त्याबाबत कार्यवाही करावी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षकातून पदवीधर शिक्षकांच्या नेमणुका करताना १०० टक्के बिंदूनामावली लागू करून आरक्षणाप्रमाणे पदे भरावीत, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या सर्व मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन समितीचे अध्यक्ष सुरेश खाडये यांनी दिले. या भेटीवेळी संघटनेच्यावतीने कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याचे सहसचिव डी. एम. चाटे, कोकण विभागीय अध्यक्ष जी. बी. चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सचिव नरेश कारिवडेकर, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, उपाध्यक्ष शिवाजी पवार, माध्यमिक संघटनेच्या सचिव वसुंधरा चव्हाण, आरोग्य कर्मचारी संघटनेचे सचिव आर. बी. चव्हाण, सदानंद सांगेलकर, दिनेश जाधव, काशिनाथ बागेवाडी, प्रदीप सर्पे आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)