शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : महायुती तुटण्याआधीच भाजप, सेनेचे अर्ज दाखल

By admin | Updated: September 25, 2014 23:27 IST

दुसरीकडे आघाडीही फुटीच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, चिपळूणमधून शेखर निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

रत्नागिरी : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१४ करिता जिल्ह्यात आज, गुरुवारी दापोली (-२६३) विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य विधानसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्र दाखल केली. आज सायंकाळी महायुती तुटल्याची घोषणा झाली अन् सेना-भाजपचा घटस्फोट होण्याआधी दुपारी रत्नागिरीतून भाजपचे सुरेंद्र तथा बाळ माने, राजापूरमधून सेनेचे राजन साळवी, चिपळूणमधून सेनेचे सदानंद चव्हाण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने वाजत गाजत जाऊन उमेदवारी अर्ज भरले. घटस्थापनेच्यादिवशीच झालेल्या घटस्फोटामुळे आता निवडणुकीत सेना-भाजप आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीही फुटीच्या उंबरठ्यावर असताना गुहागरमधून राष्ट्रवादीचे भास्कर भाऊराव जाधव, चिपळूणमधून राष्ट्रवादीचे शेखर गोविंदराव निकम यांनी आपले उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. रत्नागिरीत उदय सामंत हे येत्या २७ सप्टेंबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युती तुटल्याने व आघाडीचे बिनसल्यास जिल्ह्यातील सर्वच लढती या चौरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)अर्ज दाखल करताना सेना-भाजपची दक्षतारत्नागिरी, चिपळूण, राजापूर येथून आज शिवसेनेच्या उमेदवारांनी, तर रत्नागिरीतून भाजप उमेदवाराने विधानसभा निवडणुकीसाठी आपले अर्ज दाखल केले. त्यावेळी मित्रपक्ष भाजपचे पदाधिकारीच केवळ उपस्थित होते. महायुतीचा निर्णय झालेला नसल्याने भाजपचे कार्यकर्ते सेनेच्या मेळाव्यांना व मिरवणुकीत सहभागी झाले नव्हते. तसेच रत्नागिरीत भाजपचे बाळ माने यांच्या मेळाव्यात केवळ सेनेचे पदाधिकारीच उपस्थित होते. सेनेचे कार्यकर्ते सहभागी नव्हते.