शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

राणेंना कवडीचेही मोल नाही : भास्कर जाधव

By admin | Updated: October 21, 2014 00:18 IST

कोकणातील गुंडगिरी, असंस्कृतपणा, दहशतवादाचा मतदारांनी खात्मा केला असून, हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे.

गुहागर : सिंधुदुर्गात नारायण राणेंचा झालेला पराभव म्हणजे कोकणातील गुंडगिरी, असंस्कृतपणा, दहशतवादाचा मतदारांनी खात्मा केला असून, हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे. मीच कोकणचा नेता म्हणवून नारायण राणे यांना कोकणात कवडीचेही मोल नसल्याची टीका विजयानंतर भास्कर जाधव यांनी जाहीर व्यक्त केली.जाधव म्हणाले की, नीलेश राणे यांनी माझ्या विरोधात अपक्ष उभे राहण्याची घोषणा केली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला ३ हजार ३१० मते मिळाली. प्रत्यक्षात नीलेश राणे माझ्यासमोर उभे असते, तर ३५० मतेही मिळाली नसती. माझ्या पराभवासाठी काँग्रेसची मते भाजपकडे फिरवण्याचा कुटील डावही खेळण्यात आला. माझ्या विरोधात पक्षांतर्गत अनेक फुटीरही होते. २०० कोटींची कामे झालीच नाहीत, असे भासवण्याचा विरोधकांकडून प्रयत्न झाला. पक्षांतर्गत अनेकवेळा सहकाऱ्यांनीच माझ्या विरोधात तक्रारी केल्या. तरीही वेळोवेळी शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असे जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.आज ही स्थिती पाहता शिवसेना - भाजपची मते एकत्रित करुनही माझी मते जास्त होत आहेत. निवडणुकीपूर्वी येणाऱ्यांपैकी गीते व नातूंचा समावेश आहे. पण, जनता सतर्क आहे. केलेल्या विकासकामाला मतदान झाले, कोणीही कल्पना केली नव्हती. पण मी निवडणुकीपूर्वीच ७५ ते ८० हजार मते घेईन, असे जाहीर केले होते. याला यश आल्याचे जाधव म्हणाले. या निवडणुकीत माझे विरोधक राणे मात्र भुईसपाट झाल्याचेही जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)