शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस यंदाही रुसलेलाच!

By admin | Updated: October 1, 2015 00:34 IST

रत्नागिरी जिल्हा : पाणीटंचाईचे संकट उभे

रत्नागिरी : साधारणत: तीन ऋतू चार महिन्यात विभागण्यात आले आहेत. पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत. यावर्षी पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे भविष्यात भीषणटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून आतापासूनच पाणी साठवणुकीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जून ते आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात ४ हजार ८४६.५ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, सप्टेंबरअखेर केवळ २००० मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे.शासनाकडून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजना राबवण्यात येत आहे. जलशिवार योजनेंतर्गतही पाणी साठवणुकीसाठी बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. वनराई बंधारे, नाला बंधारे, सिमेंट बंधारे आदी विविध प्रकारचे बंधारे बांधण्याचे काम दिवाळीनंतर सुरू होते. प्रशासकीय पातळीवर लोकसहभागातून बंधारे बांधण्यात येतात. मात्र, यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बंधारे बांधण्याच्या प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्याची गरज आहे.प्रशासकीय पातळीवर याबाबत कार्यवाही होणे गरजेचे आहे. पाणी जमिनीत मुरले तरच पाण्याचा स्रोत सुधारेल. दरवर्षी मार्च, एप्रिलपासून पाणीटंचाई जाणवते. मात्र, यावर्षी जानेवारीपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात येते. जिल्ह्याचे मुख्य पीक भात आहे. नाचणी हे दुय्यम पीक घेतले जाते. जिल्ह्यातील शेतकरी दुबार पिकांतर्गत भाजीपाला, पावटा, कुळीथ, तूर, कलिंगडाचे पीक घेत असले तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. यावर्षी कमी पावसामुळे भातपिकाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिके घेणे फायदेशीर ठरेल. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली जमिनीचा पोत पाहून भाजीपाला, कडधान्ये व तत्सम् पिके घेणे गरजेचे आहे. मात्र, तसा प्रयत्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून फार कमी होताना दिसतो. त्यामुळे शेतकरी नुकसानीत येत आहे.द्वीदल धान्याचे पीक घेणे गरजेचेरत्नागिरी जिल्ह्यात तीन हजार मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, यावर्षी एक हजार मिलिमीटर इतका पाऊस कमी झाला आहे. पाऊस कमी झाल्याने नदी, ओढ्यांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे आणखी काही महिन्यात पाण्याचे स्रोत कमी होऊ नयेत, यासाठी बंधारे बांधकामासाठी तातडीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचे ६५ टक्के पाणी वाया जात असल्यामुळे पाणी जमिनीत मुरवणे गरजेचे आहे. तरच भविष्यात पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल. भातपीक कापणीस तयार होत आहे. त्यामुळे भाताला पर्यायी दुबार पिके घेण्याची आवश्यकता आहे. वाढत्या महागाईमुळे डाळीचे दर भडकले आहेत. त्यामुळे व्दीदल धान्यांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेण्यासाठी प्रयत्न करावेत. -डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ.पर्जन्यमान कमीचगेल्या वर्षीही पाऊस कमीच झाला होता. यंदा पावसाचे प्रमाण त्याहून कमी आहे. प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी पाऊस पडला त्याच्यापेक्षा खूपच कमी यंदा पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहेच, शिवाय यंदा डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने आतापासूनच पावले उचलायला सुरुवात केली आहे. भीषण पाणीटंचाईच्या शक्यतेने नागरिकही चिंताग्रस्त झाले आहेत.