खोटले धनगरवाडी माळरानावर जुगारावर धाड, १५ जणांवर गुन्हा दाखल; रोख रक्कमेसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 1, 2025 18:51 IST2025-04-01T18:51:18+5:302025-04-01T18:51:42+5:30

संदीप बोडवे मालवण : खोटले धनगरवाडी माळरानावर सुरु असलेल्या जुगाराच्या पटावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मध्यरात्री धाड ...

Raid on gambling at Khotle Dhangarwadi Malrana, case registered against 15 people | खोटले धनगरवाडी माळरानावर जुगारावर धाड, १५ जणांवर गुन्हा दाखल; रोख रक्कमेसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

खोटले धनगरवाडी माळरानावर जुगारावर धाड, १५ जणांवर गुन्हा दाखल; रोख रक्कमेसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

संदीप बोडवे

मालवण : खोटले धनगरवाडी माळरानावर सुरु असलेल्या जुगाराच्या पटावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईत चारचाकी (४), मोबाइल, दुचाकी (१) यासह १ लाख ४३ हजार रोख रक्कम व लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर जुगार खेळण्यासाठी आलेल्या जिल्हाभरातील १५ संशयित आरोपींच्या विरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरु आहे, अशी माहिती मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व मालवण पोलिसांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गचे आशिष यशवंत जामदार यांनी दिली आहे.

१ एप्रिल रोजी रात्री १.१० वाजता खोटले धनगरवाडी, मालवण येथे अंदर बाहर पट जुगारावर पैसे लावून काहीजण जुगार खेळ खेळत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी याठिकाणी धाड टाकली. सुमारे ३७ लाख ५८ हजार ६९० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम १ लाख ४३ हजार ३९० तसेच मोबाइल फोन, चारचाकी कार ४, दुचाकी १ जप्त करण्यात आले.

जुगार खेळत असल्याप्रकरणी १५ संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात गुरुनाथ साबाजी नाईक (२२, रा. आरोस, गिरोबा वाडी सावंतवाडी), रामचंद्र सदाशिव गुरसाळे (६३, रा. पटकी देवी जवळ कणकवली), महेश सुंदर आंबेरकर (४०, कणकवली), संजय श्रीधर साळगावकर (५०, रा. कट्टा गुरमवाडी मालवण), गणेश सोमा पालव (३७,रा. मसुरे मालवण), बाळकृष्ण पांडुरंग वर्धम (६९,रा. सातोसे तालुका सावंतवाडी), संतोष बाळकृष्ण कुडतरकर (५३,रा. माणगाव कुडाळ) , सुरेश श्रीधर कवटणकर (५२,रा. कवठणी सावंतवाडी), रोहित राजेंद्र गराटे (२९, रा. कासर्डे कणकवली), 

भीमसेन तुळजाराम इंगळे (४१, रा. कलमठ कणकवली), प्रशांत प्रकाश चव्हाण (४०, रा. मसुरे मालवण), तुषार नंदकुमार मसुरकर (३४, रा. कलमठ कणकवली), अक्षय नारायण चव्हाण (३५,रा. कुमामे मालवण), संदीप गोळवणकर (रा. कांबळे गल्ली कणकवली), तुकाराम खरात (रा. कलमठ कणकवली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत अधिक तपास करत आहेत.

Web Title: Raid on gambling at Khotle Dhangarwadi Malrana, case registered against 15 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.