शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

‘वनटाईम सेटलमेंट’चा प्रश्न अखेर मार्गी

By admin | Updated: September 9, 2014 23:55 IST

संदेश पारकर : तिलारी प्रकल्पग्रस्तांना मिळणार न्याय

कणकवली, सावंतवाडी : तिलारी प्रकल्पग्रस्तांना ‘वनटाईम सेटलमेंट’ म्हणून ५ लाख रुपये देण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना आता लवकरच या रकमेचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तिलारी प्रकल्पामुळे १११० प्रकल्पग्रस्त बाधित झाले आहेत. त्यांना शासनाने नोकरीत सामावून घ्यावे अथवा ‘वनटाईम सेटलमेंट’ म्हणून एकरकमी रक्कम द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने करण्यात येत होती. याबाबत आंदोलनही करण्यात आले होते. १ आॅगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र तसेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक याबाबत झाली. यामध्ये प्रकल्पग्रस्तांना ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.जलसंपदा विभागाकडून याबाबतची फाईल वित्त विभागाकडे पाठविण्यात आली. मात्र, वित्त विभागाचे प्रधान सचिव श्रीवास्तव व उपसचिव आठवले यांनी ही फाईल थांबविली होती. असा निर्णय शासनाने घेतल्यास इतर ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांनाही अशाचप्रकारे एकरकमी रक्कम द्यावी लागेल, असे त्यांचे म्हणणे होते. याबाबतचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली होती. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या समस्येबाबत आग्रही भूमिका घेतली. मंगळवारी मुंबई येथे झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तिलारी प्रकल्पग्रस्तांना एकरकमी ५ लाख रुपये देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.प्रकल्पग्रस्तांना या रकमेचे वाटप करण्यामध्ये विधानसभेच्या आचारसंहितेची कोणतीही आडकाठी येणार नाही. महाराष्ट्र शासनाचा २६.७३ टक्के तर गोवा शासनाचा ७३.३४ टक्के इतका वाटा आहे. महाराष्ट्र शासन आपल्याकडील निधी तत्काळ उपलब्ध करून देईल, असेही पारकर यांनी सांगितले. (वार्ताहर)