शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हत्याराने मारहाणप्रकरणी तेंडोलीतील दोघांना शिक्षा

By admin | Updated: February 26, 2015 00:09 IST

जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास व ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

सिंधुदुर्गनगरी : धारदार हत्याराने हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सत्यवान चंद्रकांत परब (वय ३०) व भिकाजी शंकर परब (वय ६२, रा. तेंडोली खरावतेवाडी) यांना जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास व ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. तर याच प्रकरणी विविध कलमात असलेल्या उर्वरित सहा संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, आरोपींना केलेला जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर करत प्रत्येकी पंधरा हजार रूपयांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आरोपींना उच्च न्यायालयात जाण्याची मुभा मिळाली आहे.तक्रारदार व आरोपी यांच्या वहिवाटीत असणाऱ्या जमीन जागेवरून वाद आहेत. याप्रकरणी दिवाणी दाव्याचे कामकाज सुरू होते. दरम्यान, आरोपी सत्यवान परब याला बांधकामाचे काम करण्यासाठी चिरे टाकायचे होते. ही बाब तक्रारदार पंढरीनाथ सदाशिव गावडे यांना कळताच त्यांनी सत्यवान याला चिरे टाकू नको म्हणून सांगितले. तरीसुद्धा सत्यवान याने चिरे टाकले. त्यानंतर पंढरीनाथ यांनी चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला वाटेत अडवले व पुन्हा चिरे आणायचे नाहीत, असे बजावले. यावेळी सदाशिव यांच्यासोबत सुहासिनी सदाशिव गावडे, शुभांगी गावडे, शुभदा गावडे, सदाशिव गावडे आदी उपस्थित होते. त्याच दरम्यान सत्यवान परब, भिकाजी परब, नीलेश भिकाजी परब (वय २६), चंद्रकांत शंकर परब (वय ६५), शालिनी शंकर परब (वय ५४), सुलोचना चंद्रकांत परब (वय ५४), तृप्ती चंद्रकांत परब (वय २५), रेश्मा भिकाजी परब (वय २५, सर्व रा. तेंडोली खरावतेवाडी) आदी त्या ठिकाणी आले व उद्या परत चिरे आणणार, काय ते करा, असे सांगितले. याचे पर्यावसान वादात झाले. भिकाजी परब याने सदाशिव गावडे यांच्या उजव्या खांद्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. यावेळी पंढरीनाथ सोडवायला गेले असता त्यांच्यावर सत्यवान परब याने चाकूने मानेवर हल्ला केला. नातेवाईकांनीही सोडवायचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पंढरीनाथ गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निवती पोलीस ठाण्यात वरील आठही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार १३ एप्रिल २०१० रोजी घडला होता. या प्रकरणात १४ साक्षीदार तपासण्यात आले. (प्रतिनिधी)