शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी चांगली सुविधा द्या: नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 6:36 PM

Nitesh Rane Internet Sindhudurg- केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भारत नेट हा महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला आहे. त्या प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करा आणि जनतेला चांगली सुविधा उपलब्ध करून द्या. अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी भारत नेटचे लोकेश श्रीवास्तव व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना केली.

ठळक मुद्दे पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी चांगली सुविधा द्या: नितेश राणेभारत नेटचे लोकेश श्रीवास्तव व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सूचना

कणकवली : केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भारत नेट हा महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला आहे. त्या प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करा आणि जनतेला चांगली सुविधा उपलब्ध करून द्या. अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी भारत नेटचे लोकेश श्रीवास्तव व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना केली.कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारत नेट फायबर ऑप्टिकल केबलने जोडलेल्या कनेक्शनच्या समस्या तसेच बीएसएनएलच्या त्रूटी संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आमदार नितेश राणे यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला केंद्रिय अधिकारी लोकेश श्रीवास्तव,बीएसएनएलचे सुभाष कांबळे, भारत नेटचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत राणे, श्रीकृष्ण धुरी,चेतन गावकर,सम्राट गावडे,गुरुनाथ शिर्के आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी संबधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.यावेळी केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भारत नेट या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) म्हणजे (आपले सरकार सेवा केंद्र) यांच्यामार्फत केली जात आहे. त्या अनुषंगाने बीएसएनएल व सीएससी यांचा संयुक्तिक करार झालेला असून त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही सीएससीकडे सोपविण्यात आलेली आहे. अशी माहिती देण्यात आली.बीएसएनएल व सीएससी यानी भारत नेट कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकूण ३६१ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या आहेत. त्यापैकी २९७ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा बीबीएनएल व सिएससी मार्फत कार्यान्वित झालेली आहेत.

इंटरनेट सेवा ज्या ग्रामपंचायतींमध्ये सीएससी मार्फत कार्यान्वित आहे त्या ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा सुरू झालेल्या दिवसापासून पुढील एक वर्ष पुर्णपणे मोफत असणार आहे. उर्वरित ग्रामपंचायतींचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत क्षेत्रातिल इतर ५ सरकारी आस्थापनामध्येही इंटरनेटची जोडणी या प्रकल्पा अंतर्गत केली जात आहे,अशी माहिती लोकेश श्रीवास्तव यांनी दिली.यावेळी जिल्ह्यातील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. गावागावात नेटवर्क मिळत नाही. इंटरनेटची सोया नाही , याची कारणे काय ?याबाबत डिजिटल इंडियाच्या समन्वयकांशी चर्चा करण्यात आली. अखेर ज्या समस्या आहेत त्या दिल्लीत मांडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत नेट इंटरनेट सेवा चांगल्याप्रकारे देण्यासंदर्भात लागणारी यंत्रणा व व्यवस्थेची मागणी केंद्रीय मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.त्यानंतर दर महिन्याला डिजिटल इंडियाच्या बाबत अहवाल आमच्या कार्यालयाला द्या तसेच ज्या ठिकाणी आता फायबर केबल जोडली आहे पण इंटरनेट सुविधा बंद आहे त्या दुरुस्त करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक मदत लागेल त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यात बीएसएनएलचे नेटवर्क कुठे आहे? ग्रामपंचायतमध्ये फायबर केबलने भारत नेट जोडलात तर मग ते बंद का ? नरेंद्र मोदी यांचे स्वप्न केव्हा साकार होणार ? सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, नेटवर्क नसेल तर पर्यटक कसे येणार ? अशी विचारणा बीएसएनएलचे अधिकारी व डिजिटल इंडिया भारत नेटच्या स्थानिक अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी केली.त्यावर श्रीवास्तव यांनी येत्या महिन्याभरात सेवा सुरळीत करून देण्यासंदर्भात आश्वासन दिले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे KankavliकणकवलीInternetइंटरनेटsindhudurgसिंधुदुर्ग