शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेशाला 15 जूनपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 13:21 IST

CoronaVirus Sindhudurg : कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाला आज 1 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 15 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी याबाबत काल सोमवारी आदेश दिला आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्ग : कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाला आज 1 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 15 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी याबाबत काल सोमवारी आदेश दिला आहे. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3, 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. मुख्य सचिव आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग मंत्रालय यांच्याकडूल 29 जून 2020 च्या आदेशामध्ये त्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीप्रमाणे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढण्याबाबत सर्वाधिकार दिले आहेत.महाराष्ट्र शासनाकडील आदेश त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार यापूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना 1 जून 2021 रोजीच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते 15 जून 2021 रोजी सकाळी 7 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहतील. परजिल्ह्यातून / परराज्यातून वाहतुकीस परवानगी असणार नाही. तथापि, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू, वैद्यकीय कारणाकरिता प्रवास, अत्यावश्यक / जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच कोविड 19 विषयी निगडीत व्यक्तींना यामधून सूट देण्यात येत आहे.कार्गो वाहतुकीद्वारे दुकाने / आस्थापना यांच्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास संबंधित दुकान, कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच शासनाकडील 12 मे 2021 रोजीच्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 याचे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 कायद्यातील तरतुदूप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी