शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी संदेश सावंत

By admin | Updated: September 22, 2014 01:00 IST

जिल्हा परिषद : निवडीवर सत्ताधारी सदस्य नाराज

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या संदेश सावंत यांची वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्षपदी रणजित देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या या निवडणुकीवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बहिष्कार टाकत अनुपस्थिती दर्शविली तर सत्ताधारी काही सदस्यांमध्येही धुसफूस सुरु असून सदस्य संग्राम प्रभुगांवकर हे नाराज झाले असून ते राजीनामा देणार असल्याचे समजते.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २४ व्या अध्यक्षपदासाठी रविवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज समिती सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले. यावेळी नायब तहसीलदार जी. आर. गावीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर आदी उपस्थित होते.सकाळी ११ ते १ या कालावधीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी केवळ दोनच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. खुटवड यांनी अध्यक्ष म्हणून संदेश सावंत तर उपाध्यक्ष म्हणून रणजित देसाई यांना विजयी म्हणून घोषित केले.यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, मावळत्या अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, विषय समिती सभापती प्रकाश कवठणकर, भगवान फाटक, अंकुश जाधव, श्रावणी नाईक तसेच मधुसूदन बांदिवडेकर, माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत आदींसह सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.निवडणुकीस विरोधकांचा बहिष्काररविवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेस विरोधी पक्षाच्या एकाही सदस्यांनी उपस्थित न राहता या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या निवडणुकीसाठी रविवारी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमुळे विधानसभा मतदारसंघांना मिळालेल्या प्रतिनिधीत्वामुळे विधानसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात नक्कीच फायदा होईल असे सांगतानाच विरोधी किंवा आपल्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नाराजी नसून जे सदस्य उपस्थित राहिले नाहीत त्यांचे काही धार्मिक कार्यक्रम तसेच वैयक्तिक कामे असल्याने निवडणुकीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत.- सतीश सावंत, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर यांचा बहिष्काररविवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत आपली वर्णी न लागल्याने सत्ताधारी पक्षातील काही सदस्य नाराज झाले आहेत. मालवण तालुक्यातील मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातील सदस्य संग्राम प्रभूगांवकर यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. प्रभूगांवकर हे आपल्या जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते.४जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रियेस विरोधी पक्षाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. तसेच सत्ताधारी पक्षाचे संग्राम प्रभुगांवकर, स्नेहलता चोरगे यांच्यासह काही सदस्य अनुपस्थित होते तर संग्राम प्रभुगांवकर हे अध्यक्षपदासाठी इच्छुक असून त्यांना पद न मिळाल्याने ते नाराज होऊन निघून गेले व ते राजीनामा देण्याच्या पवित्र्यात असल्याबाबत सतीश सावंत यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, नाराजीचा असा कोणताही प्रश्न नाही. विरोधकांनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकलेला नाही तर आपल्या पक्षातील कुणीही नाराज नाही. संग्राम प्रभुगांवकर यांच्या घरी काही धार्मिक कार्यक्रम असल्याने ते परवानगी घेऊन आपल्या घरी गेले आहेत. तसेच इतर सदस्यही आपल्या काही वैयक्तिक कारणामुळे येवू शकले नाहीत. मात्र त्यांनी याबाबत कळविले होते असेही सतीश सावंत यांनी स्पष्ट केले.