शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जागृतीमुळे मतदान वाढणार-प्रसाद उकर्डेे

By admin | Updated: October 6, 2014 22:29 IST

निवडणूक प्रक्रियेतील विविध कामांना वेग; आता तयारी अंतिम प्रक्रियेची

विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांनी आपला हक्क प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे बजावावा, यासाठी रत्नागिरी मतदार संघात विविध माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. जनतेत आता मतदानाच्या हक्काविषयी प्रबोधन झाल्याने या निवडणुकीत मतदानाची आकडेवारी नक्कीच वाढेल, असा आशावाद रत्नागिरी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.  येत्या १५ आॅक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. याअनुषंगाने उकर्डे यांनी या प्रक्रियेदरम्यानच्या पूर्वतयारीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, उमेदवार आणि मतदार निश्चिती हा महत्त्वाचा पहिला भाग आता संपला असून, रत्नागिरी मतदारसंघात अंतर्गत व्यवस्थापन हा दुसरा भाग सुरू झाला आहे. त्याअंतर्गत सैन्य दलातील मतदारांना टपाली मतपत्रिका पाठवण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानासाठी मतपत्रिका सुविधा केंद्र शिबिरे घेण्यात येत आहेत. जे पोलीस कर्मचारी दुसऱ्या मतदारसंघात कर्तव्य बजावण्यासाठी जाणार आहेत, त्यांच्यासाठी ४ व ५ रोजी आयोजित केलेल्या मतपत्रिका सुविधा केंद्राद्वारे ५५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिका त्याच दिवशी प्राप्त झाल्या आहेत. ही प्रक्रिया उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हिडीओग्राफीद्वारे केली जात असल्याची माहिती उकर्डे यांनी दिली.रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन्ही मतदार संघात एकूण ३४१ मतदान केंद्र आहेत. यामध्ये रत्नागिरीतील ३१०, तर संगमेश्वरातील ३१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रात एकूण २६ क्षेत्र असून, २९ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची, तर ३७५ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी एकूण १ हजार ९०४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी बारा समित्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उकर्डे यांनी दिली.ते म्हणाले, सध्या मतदार यादी चिन्हांकित प्रत करण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाचे काम म्हणजे मशिन सिलिंगचे. नवीन मतदारांची नावे चढविणे, दुरूस्ती आदी कामांचा यात समावेश आहे. ही ‘मशिन सिलिंग प्रक्रिया’ बुधवार, ८ आॅक्टोबरपासून रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन येथे सुरू होणार आहे, असेही ते म्हणाले.निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा घटक म्हणजे मतदान केंद्रांचे याद्यांसह मशिन तसेच त्या केंद्राकरिता आवश्यक असणारे सर्व विविध प्रकारचे साहित्य. रत्नागिरी मतदार संघात एकूण ३४१ मतदान केंद्र आहेत. केंद्राध्यक्ष आदल्या दिवशी म्हणजेच १४ आॅक्टोबर रोजी या केंद्रांवर दाखल होणार असल्याने हे साहित्य त्यांच्यासोबत द्यावे लागणार आहे. त्यासाठी आता हे सामान सध्या भरण्याचे काम सुरू असल्याचे उकर्डे यांनी सांगितले.उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील खर्चाचा ताळमेळ नुकताच निवडणूक निरीक्षकांसमोर घेण्यात आला. यावेळी सर्व उमेदवारांनी आपला खर्च दाखल केला. उदय सावंत या उमेदवाराने मात्र खर्च सादर न केल्याने त्याला नोटीस बजावण्यात आल्याचे उकर्डे म्हणाले. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. मतदानासाठी आता जेमतेम आठवड्याचा कालावधी राहिला असल्याने त्यादृष्टीने मतदार संघाची तयारी पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे उकर्डे यांनी सांगितले. रत्नागिरी - संगमेश्वर मतदार संघात एकूण २ लाख ६५ हजार २२५ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आला आहे. या सेंटरला ०२३५२-२२६२४८ या दूरध्वनीवर संपर्क केल्यास तेथे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे किंवा फिरत्या भरारी पथकाकडे पाठविल्या जाणार आहेत. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी त्या या क्रमांकावर पाठवाव्यात, मतदारांनी मतदानासाठी कर्तव्य भावनेतून सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी केले आहे. - शोभना कांबळे रत्नागिरीतील चारही केंद्र ‘संवेदनशील’मुक्तकोकणनगर, मुरूगवाडा, झाडगाव झोपडपट्टी आणि पेठकिल्ला या चार मतदान केंद्रांना संवेदनशील केंद्रे म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र, या केंद्रातील मतदारांनी गत निवडणुकीत या केंद्रामध्ये केलेल्या मतदानाच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले. या चारही मतदान केंद्रांवर एकही बोगस मतदान झालेले नाही, तसेच या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे यंत्रणेच्या नजरेस आणून दिले आणि आपला मतदारसंघ संवेदनशील केंद्रात सहभागी करू नये, अशी विनंती केल्याने ही चारही केंद्र आता ‘संवेदनशील’मुक्त झाली असल्याचेही रत्नागिरीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी सांगितले.