अलाईव्ह ग्रुप स्टॅच्यूमुळे लोकोत्सवात रंगत

By Admin | Updated: January 30, 2015 23:16 IST2015-01-30T22:47:20+5:302015-01-30T23:16:18+5:30

एकापेक्षा एक सरस : समूहनृत्य, लिटील लोटस चॅम्पचीही वाहवा

Painted by the Live Group stuttgue in the festive season | अलाईव्ह ग्रुप स्टॅच्यूमुळे लोकोत्सवात रंगत

अलाईव्ह ग्रुप स्टॅच्यूमुळे लोकोत्सवात रंगत

बांदा : बांदा लोकोत्सवात स्थानिक कलाकारांनी स्टॅच्यू अलाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून एकापेक्षा एक सरस स्टॅच्यू साकारत उपस्थितांची वाहवा मिळविली. या स्पर्धेत दहा स्टॅच्यू कलाकारांनी सादर केले. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या समुह नृत्य व लिटल लोटस चॅम्प कार्यक्रमाने महोत्सवाची रंगत अधिक वाढविली.महोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या स्टॅच्यू स्पर्धेला सायंकाळी उशिरा प्रारंभ झाला. या स्पर्धेत माजगाव येथील नीलेश निवजेकर यांनी महाराणा प्रताप हा स्टॅच्यू साकारुन स्पर्धेला प्रारंभ केला. यानंतर सर्वेश येडवे यांनी हाय जम्प, दत्तप्रसाद बांदेकर यांनी न्यायदेवता, प्रथमेश निब्रे यांनी साकारलेला जय मल्हार हा स्टॅच्यू विशेष दाद मिळवून गेला.
दत्तप्रसाद सावंत यांनी बॅडमिंटन ट्रॉफी, विजय शेर्लेकर यांनी शहिद जवान, अक्षय मयेकर यांनी कबड्डी ट्रॉफी, सर्वेश येडवे यांनी पोल जम्प, अनुज बांदेकर व अनिकेत येडवे यांनी नटराज, सागर तेली यांनी रिओ दी जेनेरिओ, ब्राझिल हा स्टॅच्यू साकारला. स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस स्टॅच्यू साकारत उपस्थितांची वाहवा मिळविली. उत्तररात्री पर्यंत रंगलेल्या स्पर्धेतील स्टॅच्यूंना रसिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून दाद दिली. या स्टॅच्यू कलाकारांना मनोज कल्याणकर व विवेक आंबिये यांचे मार्गदर्शन लाभले. बांद्यातील स्टॅच्यू साकारण्याची ही आगळी वेगळी कला असून या ग्रुपच्या कलाकारांची १४ फेबु्रवारी रोजी नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महोत्सवात स्थानिक कलाकारांनी समूह नृत्य सादर केले. तसेच लहान मुलांनी लिटील लोटस चॅम्पच्या माध्यमातून विविध नृत्यविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकलीत. तसेच यावेळी मिमिक्री देखील सादर करण्यात आली. या महोत्सवात रंगत आणणाऱ्या अनेक कार्यक्रमांमुळे परिसरातील विविध ग्रामस्थांनी या महोत्सवात हजेरी लावून मनमुराद आनंद लुटला. यावेळी, मोठी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Painted by the Live Group stuttgue in the festive season