शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

गव्यांकडून भातशेतीची नुकसानी

By admin | Updated: August 26, 2015 22:55 IST

शेतकऱ्यांचे धाबे दणाणले : वडाचापाट, चाफेखोल, माळगावमधील प्रकार

बागायत : गेले आठ दिवस वडाचापाट, चाफेखोल व माळगांव येथील शेतकऱ्यांचे गव्यांनी धाबे दणाणून सोडले आहेत. या तिन्ही गावातील पोलीस पाटील यांना या घटनेची माहिती येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली व पोलीस पाटलांनी शेताची पाहणी करून वन अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सर्व प्रकार सांगितला. मात्र, वनअधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांना मीठ चोळले. शेताची पाहणी करण्याचे किंवा गव्यांचा बंदोबस्त करण्याचे सोडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन पोलीस पाटीलांमार्फत केले.यावर्षी कमी पावसाचा तडाखा त्यात पेरणी, लावणी उशिर, बियाण्यांची महागाई, महागडी खते, वाढलेली मजुरी, शेतीला नसलेला बाजारभाव, विजेची वाढलेली बिले यापासून डोके वर काढून केलेली शेती. त्यात माकड, रानटी डुक्कर, इतर रानटी प्राण्यांपासून वारंवार होणारा त्रास आणि आता मात्र गेले आठ दिवस ठाण मांडून बसलेल्या गव्यांच्या कळपामुळे चाफेखोल, वडाचापाट, माळगांव येथील शेतकरी मोठ्या चिंतेत पडलेला आहे. कारण आता हातातोंडाशी आलेले भात, भुईमूग, नाचणी, भाजीपाला गव्यांनी खावून व नाचून पूर्णपणे जमिनदोस्त केला आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे कोणीही शासकीय अधिकारी किंवा ग्रामपंचायत स्तरावरील, पंचायत समिती स्तरावरील किंवा जिल्हा परिषद स्तरावरील लोकांनी दाद घेतलेली नाही याची खंत या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.चाफेखोल येथील शेतकरी रविंद्र जाधव यांनी या वन्यप्राण्यांचा वनविभागाने जर बंदोबस्त केला नाही तर आम्हा शेतकऱ्यांना शेतीशिवाय उपाशी रहावे लागेल. कारण सध्या रेशनही मिळत नाही. त्यामुळे अशी नासधूस झाल्यास आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. गव्यांच्या रोजच्या वावरामुळे शेतीच्या कामाला न जाण्याचे शेतातील कामगारांनी पसंत केले आहे. त्यामुळे ठोस पावले उचलावीत असा इशारा चाफेखोल, माळगांव, वडाचापाट येथील सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे.यावेळी शेतकरी कृष्णा जाधव, प्रकाश जाधव, रवींद्र साळुंखे, बंडू कदम, प्रमोद कदम, रवि साळकर, लवू वरक, शाहू वरक, रवींद्र जाधव, सुरेश खांबल, बाळा कदम उपस्थित होते. (वार्ताहर)