शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संघटीत महिला शक्तीचे दर्शन

By admin | Updated: August 21, 2014 00:25 IST

मिळून साऱ्याजणी महिला मंचचा कार्यक्रम

कणकवली : ‘रिमझिम सरी ग रिमझिम सरी, तुझ्यापेक्षा माझी फुगडी बरी’ अशा विविध गीतांच्या साथीने कणकवली परिसरातील महिलांनी फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. निमित्त होते ते येथील मिळून साऱ्याजणी महिला मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मन भावन श्रावण’ कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संघटीत महिला शक्तीच्या आविष्काराचे दर्शनच जणू उपस्थितांना घडले.येथील दुर्गाराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात फुगड्यांबरोबरच महिलांनी घेतलेली वैविध्यपूर्ण उखाणी उपस्थितांची दाद मिळवून गेली. श्रावण महिन्यामध्ये विविध सण साजरे करण्यात येतात. तसेच गणेशोत्सवाचे वेधही या काळात लागलेले असतात. या सणांच्या निमित्ताने फुगड्या खेळण्याचा आनंद महिला लुटत असतात. फुगड्यांच्या निमित्ताने आपल्या मनातील भावना इतर सख्यांकडे व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळत असते. मात्र, अलिकडे फुगडी-झिम्मासारखे पारंपरिक खेळ कमी झाले आहेत. त्यांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी, तसेच आपल्या दैनंदिन कामातून थोडासा वेळ महिलांना देता यावा यासाठी दरवर्षी मिळून साऱ्याजणी महिला मंचच्यावतीने श्रावण महिन्यात फुगड्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.दिंडा, कोंबडा, बसफुगडी, पिंगा, एका हाताची फुगडी, ढोपर फुगडी, माकड फुगडी, गौळण फुगडी, होडी, सुसर, मासा अशाप्रकारे १५ पेक्षा जास्त विविध प्रकारच्या फुगड्या घालत महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. फुगड्यांमधून शरीराची लय, तोल आणि व्यायामाचा मेळ घातला जातो. फुगड्या खेळणे म्हणजे प्रेमाने गरगर फिरणे. यामधून मनाची आनंददायी स्थिती स्त्रियांना अनुभवता येते. फुगड्यांमधून विविध गाणी गात, खेळ खेळले जातात. यातूनच विवाहित महिलांचा संवादी मेळ रंगत जातो. त्यात अनेक मुलीही सामील होतात. या सर्व गोष्टींचे दर्शन मिळून साऱ्याजणी महिला मंचने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून पुन्हा एकदा झाले. या कार्यक्रमाच्यावेळी जिजाऊ महिला महाबचतगटाच्या अध्यक्षा नीलम राणे, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, माजी नगरसेविका समृद्धी पारकर, मधुरा पालव, तेजल लिंग्रज यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. (वार्ताहर)