शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हे करण्याचे संचालकांचे आदेश

By admin | Updated: November 9, 2014 00:34 IST

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज

सिंधुदुर्गनगरी : संपूर्ण राज्यात डेंग्यू तापाने थैमान मांडले असून कित्येकजणांचा बळीही या तापाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या निर्मूलनासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरु करण्याचे आदेश आरोग्य संचालक सतीश पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभाग कामाला लागला असून साथरोग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यात डेंग्यू तापाने थैमान मांडले आहे. हजारो रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे. तर कित्येकजणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे. सिंधुदुर्गात मात्र डेंग्यूचे रुग्ण आढळत असले तरी या तापाने सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. असे असले तरी या डेंग्यूच्या निर्मूलनासाठी पूर्ण जिल्हाभर सर्वेक्षण करा असे आदेश आरोग्य संचालक पवार यांनी देत आरोग्य विभागास सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या साथीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त करून शहरी भागात होत असल्याने शहराच्या ठिकाणी जास्त लक्ष ठेवण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राज्यात डेंग्यूने थैमान मांडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, कोणत्याही रुग्णाचा या साथीने मृत्यू झालेला नाही. डेंग्यू हा साथरोग नियंत्रणात येण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून आरोग्यसेवक, सेविकांमार्फत गृहभेट कार्यक्रमही सुरु आहे. तसेच या रोगाच्या निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. औषधसाठाही पुरेसा आहे. (प्रतिनिधी)