शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधीक्षक कार्यालय अद्याप पिछाडीवर

By admin | Updated: February 26, 2015 00:09 IST

बंधाऱ्यांची उद्दिष्ट्यपूर्ती : दोडामार्ग, मालवण, वैभववाडी अग्रेसर

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी यासाठी जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ७०० बंधाऱ्यांपैकी ४ हजार ७८५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आलेले उद्दिष्ट्य दोडामार्ग, मालवण व वैभववाडी या तालुक्यांनी १०० टक्क्यांहून अधिक पूर्ण केले आहे तर जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालय पिछाडीवर राहिला आहे.साधारणत: मे अखेरीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भासण्यास सुरुवात होते. त्यातच यावर्षी कमी पडलेला पाऊस त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्याने यावर्षीही मे महिन्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षी कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ हजार ७०० बंधाऱ्यांचेही उद्दीष्ट्य प्रत्येक तालुक्यात विभागून दिले. आठ तालुक्यांना ५ हजारांचे तर राज्य शासनाच्या कृषी विभाग १५०० व सामाजिक वनीकरण विभागाला २०० असे बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट्य दिले होते. आजअखेर ६७०० बंधाऱ्यांपैकी १८९७ कच्चे व २८८८ वनराई असे ४७८५ बंधारे बांधण्यात आले आहेत.काही तालुके १00 टक्केवरपाणीटंचाईवर मात करण्यासाठी देण्यात आलेले बंधाऱ्यांचे उद्दिष्ट्य दोडामार्ग, मालवण व वैभववाडी तालुक्यांनी १०० टक्क्यांच्यावर पूर्ण केले आहे. त्याबद्दल प्रशासनाच्यावतीने तालुक्यांनी अभिनंदन केले जात आहे.कणकवली तालुका जैसे थेकणकवली तालुक्याला जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने ८५० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्यापैकी या तालुक्याने नोव्हेंबर २०१४ अखेर कच्चे बंधारे ३२१ व वनराई बंधारे १९९ असे मिळून ५२० बंधारे बांधले होते. मात्र डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या अडीच महिन्यांच्या कालावधीत या तालुक्याने एकही बंधारा बांधला नसल्याचे प्रशासनाच्या अहवालानुसार उघड झाले आहे. (प्रतिनिधी)