शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात आता लक्ष प्रचारसभांकडे

By admin | Updated: October 6, 2014 22:37 IST

स्टार प्रचारक शेवटच्या टप्प्यात रिंगणात उतरविणार असल्याने रणधुमाळीत कमालीची रंगत चढणार

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सध्या दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात उमेदवार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात त्या त्या गावातील पुढारी, गावकरी मंडळी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याची आश्वासने दिली जात आहेत. आता मतदानाला सात दिवसांचा कालावधी उरल्याने प्रचाराचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा सुरू होणार असून, या टप्प्यात नेत्यांच्या आणि स्टार प्रचारकांच्या सभांमध्ये खडाजंगी रंगणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शिवसेनेकडून दस्तुरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसात कोकणात प्रचारसभा घेऊन कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणात रत्नागिरी आणि कणकवली येथे प्रचारसभा घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सावंतवाडीत सभा घेणार असल्याचे राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसकडून प्रचारप्रमुख नारायण राणे यांच्या जाहीर सभा होतील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणदेखील कोकणात दौरा करणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कोट्यातील स्टार प्रचारक शेवटच्या टप्प्यात रिंगणात उतरविणार असल्याने रणधुमाळीत कमालीची रंगत चढणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात ज्या ज्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा झाल्या त्या त्या भागात भाजपाने मोठी मुसंडी मारली. समोरील उमेदवारांचा मोठा पराभवही झाला. परंतु त्या निवडणुकीत मोदी लाट होती. कोकणात मोदींची सभा झाली नव्हती. तरीदेखील येथे शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र, त्यावेळच्या परिस्थितीत महायुती म्हणून शिवसेना, भाजप, आर. पी. आय. एकत्र होते आणि राष्ट्रवादीच्या नाराज गटानेही कोकणात काँग्रेसविरोधी काम केले होते. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे. आता प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या सभेमुळे कोणता इफेक्ट होतो. भाजपाची कोकणातील ताकद वाढणार काय ? असे अनेक प्रश्न सध्या राजकीय विश्लेषकांसमोर असताना याच बाबतीत येथील जनतादेखील उत्सुक आहे. त्यामुळे आता कोकणातील सर्व जनतेचे लक्ष नरेंद्र मोदींच्या सभेकडे लागले आहे.नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कोकणात जाहीर सभा घेणार असल्याने ते कोणत्या लोकल विषयावर बोलतात की, इतर ठिकाणी होणाऱ्या सभांप्रमाणे राष्ट्रीय मुद्दे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीवर टीका करतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींची सभा ही कोकणातील मतदारांसाठी एक वेगळे आकर्षण राहणार आहे. ऐन प्रचाराच्या समारोपाला कोकणात रत्नागिरी आणि कणकवलीत जर मोदींची सभा झाली तर भाजपाची लाट कोकणात येईल की काय? असा प्रश्न सध्या सर्वांसमोरच आहे. परंतु कोकणातील जनतेला मोदी पहिल्यांदाच संबोधीत करणार असल्याने त्याबाबतची वेगळी ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे.पडद्यामागेमहेश सरनाईक