शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना आता ‘आधार’चाच आधार

By admin | Updated: July 4, 2015 00:12 IST

बोगस पटनोंदणीला चाप : माध्यमिक शाळांची अस्तित्व टिकविण्याची धडपड

सागर पाटील - टेंभ्ये -राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी यापुढे केवळ आधार कार्डचाच आधार घ्यावा लागणार आहे. शाळांच्या संचमान्यतेसाठी आधारकार्ड ओळखपत्र असणारे विद्यार्थीच ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यामुळे शाळास्तरावर होणाऱ्या बोगस पटनोंदणीला पूर्णत: चाप लागणार आहे. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून घेण्याची जबाबदारी शाळांची असून, यासाठी आवश्यक यंत्रणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी स्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सध्या सर्व शिक्षण संस्थांचे आॅनलाईन रजिस्ट्रेशन सरु आहे. यानंतर शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एक अध्यादेश प्रसिद्ध केला असून, यानुसार संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक गृहीत धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील काही शाळांमध्ये बोगस विद्यार्थी नोंदवणे, पटावर जास्त विद्यार्थी दर्शवून जादा तुकड्यांची मागणी करणे, एकाच मुलाचे नाव अनेक शाळांच्या पटावर असणे यांसारखे अनेक प्रकार शासनाच्या निदर्शनास आले आहेत. आॅक्टोबर २०११ मध्ये झालेल्या पटपडताळणीमध्ये या बाबी सिद्ध झालेल्या होत्या. यामुळे शासन स्तरावरुन काढण्यात आलेल्या या नवीन आदेशानुसार सन २०१६-१७पासून कोणत्याही शाळेची संचमान्यता प्रदान करताना सर्व विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक असणे आवश्यक केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आधार क्रमांक मिळवून देणे ही शाळेची जबाबदारी आहे.सध्या राज्यातील सर्व शिक्षण संस्थांचे आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले जात आहे. यामध्ये संस्थेची सविस्तर माहिती, विविध पुराव्यांसह अपलोड करणे आवश्यक आहे. संस्थेचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर याच लिंकवर शिक्षक, कर्मचारी यांची आॅनलाईन आधार नोंदणी केली जाणार आहे. यामध्ये शिक्षकांच्या हाताचे ठसेही अपलोड करण्यात येणार आहेत. शिक्षक व कर्मचाऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या सर्व नोंदी झाल्या नाहीत तर शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा आॅनलाईन पगार जमा करण्यात अडथळा येणार आहे.या सर्व आॅनलाईन नोंदणीमुळे शाळेच्या स्थापनेपासून सर्व घटकांची आॅनलाईन नोंद होणार आहे. शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक, आयुक्त, शिक्षण सचिव अथवा मंत्र्यांना एका लिंकवर ही सर्व माहिती मिळणार आहे. शिक्षकाच्या हाताचे ठसेही अपलोड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदर आधारचे महत्व वाढते आहे. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सक्तीची आहे. राज्यामध्ये जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर आवश्यक यंत्रणा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शाळांनी आधारकार्ड नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तत्काळ काढून घ्यावे ही बाब आवश्यक आहे. - सुनील जठार,शिक्षक सहसंचालक, महाराष्ट्र राज्य