शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अणाव नगरपंचायतीत नको

By admin | Updated: February 24, 2016 00:12 IST

ग्रामस्थांची मागणी : स्वतंत्र ग्रामपंचायतच ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीला रानबांबुळीपाठोपाठ अणाव ग्रामस्थांनी कडाडून विरोध करून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे लेखी हरकत मंगळवारी नोंदविली आहे. ही नगरपंचायत झाल्यास अणाव गावाला फायद्याऐवजी नुकसानच सहन करावे लागणार आहे. म्हणून अणाव गाव सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेतून वगळावे व स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात रहावी, अशी मागणीही यावेळी अणाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.ओरोस, रानबांबुळी व अणाव या तीन गावांची मिळून सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापन होण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली. या नगरपंचायतीसंदर्भात कोणाच्या हरकती असल्यास एक महिन्याच्या आत नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले होते. अणाव ग्रामस्थांनी हरकत नोंदविताना म्हटले आहे की, या गावात दोन हजार मतदार व दोन हजार सहाशे लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात मोडणारा हा गाव आहे. हा गाव सिंधुदुर्गनगरीपासून लागून असला तरी सिंधुदुर्गनगरी ते अणाव असा जवळ जवळ सहा ते सात किलोमीटर अंतरावर या गावाचे टोक आहे. त्यात या ग्रामस्थांना शॉर्टकट असा अणावमधून एकही रस्ता सिंधुदुर्गनगरी येथे जाण्यासाठी नाही. सिंधुदुर्गनगरीत यायचे झाल्यास पणदूरमार्गे यावे लागते. म्हणून अणाव ग्रामपंचायत अस्तित्वात रहावी व गाव सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतमधून वगळावा, अशी मागणी अणावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष गोपाळ पालव, माजी सरपंच सेजल पाटकर, विनायक अणावकर, माजी उपसरपंच हरिश्चंद्र पवार, ग्रामस्थ योगेंद्र पालव, शशिकांत पालव, जनार्दन पालव, बाबूराव पालव, सुहास पालव, शोभना पालव, यांच्यासह १२९ ग्रामस्थांच्या सह्या या हरकतीवर आहेत. (प्रतिनिधी)