शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे साखरेची उचल करणार नाही

By admin | Updated: February 24, 2015 00:02 IST

वेंगुर्लेत सभा : धान्य दुकानदार संघटना आक्रमक

वेंगुर्ले : गेली कित्येक वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेशन दुकानदार पिवळ्या कार्डधारकांना लेव्ही साखर विक्री करत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने चक्क २० रुपयांचा तोटा सहन करा व साखर विक्री करा, असा फतवा काढल्याने यापुढे साखर उचल न करण्याचा एकमुखी निर्णय धान्य दुकानदार संघटनेच्या सभेत घेण्यात आला. वेंगुर्ले तालुका धान्य दुकान संघटनेची सभा सिध्दिविनायक कार्यालय, वेंगुर्ले येथे संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. या सभेस अशोक राणे, रवींद्र पेडणेकर, दादा गावडे, आपा गावडे, श्रीकांत खोत, शेखर पालयेकर, वेतोरे धान्य दुकानदार बबन कांबळी आदी उपस्थित होते. कमी दरात साखर विक्री करण्याच्या निर्णयावर व एपीएल कार्डधारकांच्या धान्यासंदर्भात यात चर्चा करण्यात आली. गेली कित्येक वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेशन दुकानदार पिवळ्या कार्डधारकांना लेव्ही साखर विक्री करीत आहेत. पण आता शासनाने कहर केला. चक्क २० रुपये तोटा सहन करा व साखर विक्री करा, असा फतवा निघाला. या संदर्भात संघटनेची सभा होऊन सर्व धान्य दुकानदारांनी साखर उचल न करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यातील संघटना रिबेट व मार्जिन वाढ व्हावी, याकरिता आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण शासन दाद देत नाही. भरमसाट वाढलेली वाहतुकीची भाडी (डिझेल कमी होऊनही भाडे कमी होत नाही), मनमानी हमाली या सर्व गोतावळ्यात धान्य दुकानदार डबघाईस आले आहेत. त्यात दर महिन्या-दोन महिन्यांनी नोकर असल्यासारखे वेगवेगळी कामे करायला शासन भाग पाडत आहे. त्याचा कोणताही मोबदला दिला जात नाही. मग अमूक काम अमूक दिवसात पूर्ण करा. हे फॉर्म भरा, ती रजिस्टरे तयार करा, ग्राहकांचे बँक खातेक्रमांक करा, आधारकार्ड नंबर भरा, हे सर्व आम्ही का करावे, त्यासाठी शासन पगार देते का? ही हाताशी यंत्रणा आहे, म्हणून जबरदस्तीने तिला शासन राबवतेय? जे काम तलाठ्यांनी करावयाचे ते आमच्या गळ्यात का मारले जाते? असा आरोप यावेळी करण्यात आला. वास्तविक या सर्व धान्य वितरणाच्या बाबतीत चेअरमन लोकांनी उचल घेतली पाहिजे होती. कारण धान्य दुकानातील तोटा म्हणजे ज्या रकमेतून धान्य खरेदी करतो, त्या तोट्यामुळे धान्य खरेदीचे भांडवल कमी होते, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा संस्थेची दुकाने व संस्थेचे कर्मचारी यांना जिवंत ठेवण्यासाठी सर्व चेअरमननी आपले कर्मचारी व त्यांचे कुटुंब इतर शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे कसे जगतील, याचे प्रयत्न करावेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. (वार्ताहर)शासन अन्याय करत असल्याचा आरोपआज ना उद्या शासन न्याय देईल, या आशेवर आम्ही शासनाची बरीच कामे करीत आलोय. पण न्याय नाहीच, उलट शासन आमच्यावर अन्यायच करीत आहे. यात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दोष देणार नाही. शासनाचे आदेश येतील, त्याप्रमाणे ते आम्हाला सांगतात. यात शासनच दोषी आहे, अशा भावना धान्य दुकानदारांनी व्यक्त केल्या.