Shaktipeeth Highway: सावंतवाडी तालुक्यात जमीन अधिग्रहणासाठी नीस, एमएसआरडीसीकडून सर्व्हे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:45 IST2025-04-17T16:43:55+5:302025-04-17T16:45:37+5:30
सावंतवाडी : स्थानिक जनतेने कुठल्याही प्रकारची मागणी न करता शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथी मारण्याचा घाट राज्यातील महायुती सरकारने ...

Shaktipeeth Highway: सावंतवाडी तालुक्यात जमीन अधिग्रहणासाठी नीस, एमएसआरडीसीकडून सर्व्हे सुरू
सावंतवाडी : स्थानिक जनतेने कुठल्याही प्रकारची मागणी न करता शक्तिपीठ महामार्गसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथी मारण्याचा घाट राज्यातील महायुती सरकारने घातलेला आहे, असा आरोप उद्धवसेनेचे डाॅ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. त्या दृष्टीने या सहापदरी महामार्गाचा एमएसआरडीसीकडून सर्व्हे देखील सुरू झालेला आहे.
जागोजागी महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी नीस लावण्यात येत आहेत. गेळे, आंबोली पारपोली, वेर्ले, नेनेवाडी, उडेली, फणसवडे, घारपी, फुकेरी, तांबोळी, डेगवे, बांदा अशा बारा गावांतून हा महामार्ग जाणार आहे. यापैकी बहुतेक गावे ही इकोसेन्सिटीव्ह जाहीर करावीत, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, तसेच हा वाईल्ड लाईफ काॅरिडाॅरचा अविभाज्य भाग आहे.
बेसुमार वृक्षतोड
१०० मीटर रुंदीच्या या महामार्गासाठी लाखो वृक्ष तोडले जाणार आहेत. आधीच वृक्षतोड बंदी असताना या पट्ट्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. या महामार्गासाठी होणारी वृक्षतोड या जैवविविध निसर्गासाठी मृत्यूची घंटा ठरेल असेही परुळेकर यांनी यात म्हटले आहे. सह्याद्री पट्ट्यातील आणि घाटाच्या पायथ्याशी गावांमध्येच पिण्याच्या आणि शेती बागायतीच्या पाण्याचे स्रोत बंद होऊन समस्या निर्माण होईल.
महामार्ग जिल्ह्यासाठी घातक ठरणार : परूळेकर
सामान्य जनतेला नको असलेला ८६००० कोटी रुपयांची जनतेच्या पैशाची लूट करून कंत्राटदार आणि सत्ताधारी राजकीय पुढारी यांचे उखळ पांढरे करणारा हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी घातक ठरणार आहे, असे मत डॉ. परुळेकर यांनी व्यक्त केले आहे