आवडीची शिक्षण व्यवस्था हवी : महाजन

By Admin | Updated: January 13, 2015 00:15 IST2015-01-12T21:56:14+5:302015-01-13T00:15:11+5:30

प. ए. सोसायटीतर्फे सत्कार : बर्वे यांच्या कला दालनाचे उद्घाटन उत्साहात

Need a good education system: Mahajan | आवडीची शिक्षण व्यवस्था हवी : महाजन

आवडीची शिक्षण व्यवस्था हवी : महाजन

चिपळूण : विद्यार्थ्यांच्या जीवनात रंगत येईल, त्यांचे जीवन फुलून जाईल, यासाठी त्यांच्या आवडीच्या कलागुणांना वाव देण्याची गरज असून, त्यापद्धतीने शिक्षण व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले. लोकमान्य टिळक वाचन मंदिराच्या शतायु गं्रथालये व ग्रंथकार अधिवेशनानिमित्त चिपळूण दौऱ्यावर आलेल्या लोकसभेच्या अध्यक्षा महाजन यांचा परशुराम एज्युकेशन सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाजन यांच्या हस्ते मधुकाका बर्वे कलादालनाचा शुभारंभ करण्यात आला.
लोकसभेच्या अध्यक्षा महाजन म्हणाल्या की, आज मधुकाका बर्वे यांच्या कलादालनाचे उद्घाटन आपल्या हस्ते झाले. मात्र या कलादालनाला बर्वे काकांचेच नाव का दिले असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला असेल. त्यावेळी कलाशिक्षक म्हणून माजलेकर होते. मग त्यांचेच नाव का असा प्रश्न पडला असेल परंतु, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बर्वे यांनी दिला.
यावेळी माजी आमदार नाना जोशी, संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.विनय नातू, डॉ.जयंत मेहेंदळे, शरद साठे, सुधाकर भागवत, मनिष भागवत, मकरंद जोशी, सरोज नेने, भाजपचे युवा नेते माधव गवळी, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बुरटे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Need a good education system: Mahajan