शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रायझिंग हाऊस उभारणे गरजेचे : शरद पवार

By admin | Updated: May 15, 2014 00:29 IST

सिंधुदुर्गनगरी : परदेशात येथील हापूस आंब्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. यामागची कारणे शोधली पाहिजेत. याचा अभ्यास केला असता

सिंधुदुर्गनगरी : परदेशात येथील हापूस आंब्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. यामागची कारणे शोधली पाहिजेत. याचा अभ्यास केला असता प्रकर्षाने जाणवते की फळांवर प्रक्रिया करण्यासाठी रायझिंग हाऊस (फळांची काळजी घेणारे केंद्र) आपल्याकडे नाही. तसेच पॅकींग हाऊसही नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची गरज आपल्याला आहे. आंबा उत्पन्नाबाबत काळजी घेतल्यास भविष्यात अशी परिस्थिती आपल्यावर ओढवणार नाही. असे मत केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्गनगरीमध्ये बोलताना व्यक्त केले. सिंधुदुर्गात कृषी भवनाची उभारण्यात आलेली वास्तू एखाद्या पंचतारांकीत हॉटेलप्रमाणे आहे. महाराष्ट्रात कुठेही अशी वास्तू नाही. या वास्तूमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन होण्यासंबंधी संधी निर्माण केल्या पाहिजेत. ही वास्तू सतत गजबजलेली असली पाहिजे. हे केंद्र लोकोपयोगी होण्यासंबंधी काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून बसून नियोजन केले पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीचे सरचिटणीस कै. अ‍ॅड. गुरूनाथ कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गनगरी येथे साकारलेल्या शरद कृषी भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कोकणचा प्रदेश हा निसर्गसौंदर्याने भरलेला आहे. येथील काजू, आंबा, नारळ, कोकम या फळबागासंबंधी प्रश्न सोडविण्याचा आपला कायमच मानस राहिला आहे. त्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. मत्स्य व्यवसायासाठी खाडीजवळील जागा घेवून त्यात कोळंबी शेती करता येईल. वास्तूचे रूपांतर कृषी माहिती केंद्रात व्हावे शरद कृषी भवनाची भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. मात्र, नुसती वास्तू उभारून चालणार नाही. तर तिचे रूपांतर कृषी माहिती केंद्र म्हणून झाले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून पुढच्या कार्यक्रमाची दिशा आखूया. असे आवाहनदेखील पवार यांनी यावेळी केले. शेतीक्षेत्रात आमूलाग्र बदल गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत आपण कृषीमंत्री झाल्यानंतर देशाच्या शेतीक्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. गेल्यावर्षी २५९ दशलक्ष टन धान्याची विक्रमी निर्मिती झाली. यावर्षी यात आणखीन भर पडून हा आकडा २६४.३८ दशलक्ष टन एवढा झाला. गहू, तांदूळ, डाळ, कापूस तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये विक्रमी उत्पादनामध्ये भारत पहिल्या क्रमांकाचा देश बनला. तांदूळ निर्यात करण्यामध्ये भारत हा देश जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला तर गहू, साखर, कापूस यामध्ये जगातील दोन क्रमांकाचा देश बनला. त्याचप्रमाणे फळबागांची निर्मिती, फळांची निर्मिती यामध्येही जगात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. मात्र, मार्केटींग करण्यामध्ये आपण मागे पडत आहोत, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग देशातील आदर्श जिल्हे आपण कृषीमंत्री झाल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा फायदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या देशातील दोनच जिल्ह्यांना झाला नाही. कारण या जिल्ह्यात शेतकर्‍यांनी घेतलेली कर्ज ते प्रामाणिकपणे परत करतात. येथील लोक ठकवाठकवी करत नाहीत. घेतलेले कर्ज व्याजासहीत परत देण्याची कोकणी माणसाची प्रवृत्ती वाखाणण्याजोगी आहे.