शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भारती संघटनेचे धरणे आंदोलन

By admin | Updated: October 20, 2014 22:31 IST

अतिरिक्त शिक्षक पदे कमी करण्याच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयात घेतली धाव

सिंधुदुर्गनगरी : माध्यमिक शिक्षकांची पगार बिले माध्यमिक शिक्षण विभागाकडून स्वीकारली जात नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हा परिषद भवनासमोर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेने एकदिवशीय धरणे आंदोलन छेडले. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण विभागाने माध्यमिक शिक्षकांची अनेक पदे संच मान्यतेदरम्यान ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरविली आहेत. अनेक शाळांतील शिक्षकांना कमी करण्याचे आदेशही दिले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाची ही कार्यपद्धती घटनाबाह्य असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळ पणदूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या अनुषंगाने प्राप्त परिस्थितीत सर्व शिक्षक पदे ‘जैसे थे’ ठरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले असल्याने आणि त्यामुळे एकही शिक्षक अतिरिक्त ठरत नसल्याने आॅफलाईन पेमेंट पद्धतीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.सर्वच वेतन आॅनलाईन पद्धतीने होणे अपेक्षित असताना शिक्षण विभागाच्या पगारपत्रके न स्वीकारण्याच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला आहे. कमी करण्यात आलेल्या पदावरील कर्मचारी हे जसे आहेत त्याच स्थितीत राहणार आहेत. त्यामुळे पगार होणे अपेक्षित असताना व कामाचा मोबदला हक्काने मिळणे गरजेचे असताना शिक्षण विभागाने सप्टेंबरची पगारपत्रके स्वीकारण्यास नकार दिल्याने निषेध म्हणून हे आंदोलन छेडण्यात आल्याचे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी सांगितले. तसेच आंदोलनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आला.यावेळी अध्यक्ष संजय वेतुरेकर, सुरेश चौकेकर, कमलेश गोसावी, अनिता सडवेलकर, रुपेश बांदेकर, शांताराम गावडे आदींसह अनेक माध्यमिक शिक्षकांचा आंदोलनात सहभाग होता. (प्रतिनिधी)