शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरांचा तास बुडाला

By admin | Updated: September 5, 2014 23:30 IST

कणकवली अत्यल्प प्रतिसाद : शाळेच्या सुट्टीचा फटका

कणकवली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसारीत होणारे भाषण सर्व विद्यार्थ्यांना ऐकवण्याचा घाट घालण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या सुट्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांचा हा तास बुडाला. यावर पर्याय म्हणून पंतप्रधानांचे रेकॉर्ड केलेले भाषण शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार आहे. पंतप्रधान थेट संवाद साधणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषण ऐकावे यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली होती. तसा लेखी आदेश शिक्षण उपसंचालकांकडून जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक शाळेला पाठविण्यात आला होता. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाची सुट्टी ८ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी विद्यार्थी जमवण्यासाठी बैठका घेत नियोजन करण्यात आले. शाळेनजीकच्या विद्यार्थ्यांना बोलवण्याचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांवर हे भाषण पाहण्याची सक्ती नसल्याचा खुलासा केंद्रीय स्तरावरून करण्यात आल्यानंतरही तसे पत्र प्राप्त न झाल्याने शिक्षण विभागाने पूर्वीच्या आदेशाने नियोजन केले होते. सुट्टीमुळे भाषणाला विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला. यावर उपाय म्हणून पंतप्रधानांचे मुद्रीत भाषण शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऐकविण्यात येणार आहे. दरम्यान, शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा लाभला आदी बाबींचा अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. हा अहवालही शिक्षकांकडून सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)टीव्ही बंदअनेक शाळांमध्ये टीव्ही संच जुनेपुराणे झालेले असून त्यांची दुरूस्ती न झाल्याने बंद होते. त्यामुळे काही शाळांमध्ये संगणक मॉनिटरवर हे भाषण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही ठिकाणी शाळेनजीक घरामध्ये विद्यार्थ्यांना जमवून हे भाषण दाखवण्यात आले. गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने अर्थातच या उपक्रमाला अत्यल्प प्रतिसाद लाभला.