मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य, बंदर विकास खात्याचा पदभार स्वीकारला; अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा
By सुधीर राणे | Updated: December 24, 2024 15:50 IST2024-12-24T15:49:12+5:302024-12-24T15:50:05+5:30
कणकवली : कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात मत्स्य आणि बंदर विकास खात्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ...

मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य, बंदर विकास खात्याचा पदभार स्वीकारला; अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा
कणकवली : कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात मत्स्य आणि बंदर विकास खात्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर खातेप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला.
मंत्री नितेश राणे हे कणकवली येथून सोमवारी मुंबईला रवाना झाले होते. मंगळवारी सकाळी त्यांनी मुंबईतील प्रभादेवी येथे जाऊन श्री सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर मंत्रालयाच्या तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
त्यानंतर मंत्रालयातील दालन क्र. २ मध्ये जाऊन पदभार स्वीकारला. तसेच मत्स्य आणि बंदरे विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला.अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.