शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण

By admin | Updated: July 28, 2015 20:43 IST

भाई चव्हाण : प्राथमिक शिक्षक समितीच्या सभेत वादळी चर्चा

सिंधुदुर्गनगरी : शालेय कामातील त्रुटींबाबत बाजू मांडण्याची संधी न देता प्रशासनामार्फत उर्मट भाषेत दरडावले जाते. केवळ शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी ही कार्यपद्धती अवलंबिली जाते, याबद्दल नाराजी व्यक्त करून पदाधिकाऱ्यांच्या या कार्यपद्धतीचा समाचार शिक्षक नेते भाई चव्हाण व राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी घेतला. प्राथमिक शिक्षक समितीच्या ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात झालेल्या सभेत वेगवेगळ्या तालुक्यात लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शाळांना आकस्मिक भेटी देऊन शिक्षकांना अवमानित केले याची चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी खच्चीकरण करण्याच्या या पद्धतीत जर बदल झाला नाहीतर शिक्षक समितीला या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला. शैक्षणिक गुणवत्तेबाबत काळजी करताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शाळांचे जे प्रश्न निर्माण झालेत ते सोडविण्यासाठी का प्रयत्न होत नाहीत? विविध अशैक्षणिक कामांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम झाला हे स्वत: शालेय शिक्षण प्रधान सचिव यांनी मान्य केले आहे. शिक्षकांना सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून मुक्त करून शिक्षकांची सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरून व माध्यमिक शिक्षकांप्रमाणे शाळेतील १०० टक्के वेळ अध्यापनासाठी उपलब्ध करून देऊन नंतरच गुणवत्तेचा डंका मिरवावा.शिक्षकांच्या शालेय कामकाजात त्रुटी असतील, तर त्याला लेखी पत्र देऊन खुलासा घ्यावा. परंतु, विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाला अवमानित करण्याच्या कार्यपद्धतीला समितीचा विरोध राहील, असेही भाई चव्हाण व चंद्रकांत अणावकर यांनी इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)शिक्षण विभाग प्रशासनाच्या अक्षम्य चुकांमुळे शाळांना सादील अनुदान मिळत नाही. शैक्षणिक साहित्य, वाहतूक भत्ता दिला जात नाही. शालार्थ व सरल संगणकीय प्रणालीसाठीच्या सोयी सुविधा शाळांना पुरविल्या जात नाहीत. आर.टी.ई. अधिनियमात तरतूद असताना शिक्षकांच्या दीर्घ मुदत रजा काळात स्वयंसेवक नेमले जात नाहीत. शाळांना आवश्यक स्टेशनरी पुरविली जात नाही. या व अशा अनेक समस्यांबद्दल लोकप्रतिनिधी सभांतून अवाक्षर न काढता प्रशासनाला पाठीशी घालतात.