शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेसाठी झुकते माप?

By admin | Updated: November 10, 2014 23:54 IST

प्रश्न मार्गी लागणार? : सुरेश प्रभूंच्या रेल्वेमंत्रिपदामुळे कोकणवासीयांच्या आशा पल्लवीत

राजापूर : केंद्रीयमंत्री मंडळात समावेश झाल्यानंतर रेल्वेसारखे महत्त्वपूर्ण मंत्रिपद लाभलेल्या सुरेश प्रभूंमुळे कोकण रेल्वेला चांगले दिवस प्राप्त होतील. शिवाय प्रलंबित सौंदळ रेल्वे स्थानकालादेखील चालना मिळेल, अशी आशा कोकणवासीयांना लागून राहिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात माजी मंत्री सुरेश प्रभू यांचा समावेश करण्यात आला आहे. कॅबिनेटमंत्री म्हणून नियुक्ती झालेल्या प्रभूंकडे रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुपूर्द केला आहे. या निवडीमुळे मागील अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला रेल्वे खाते लाभले आहे. यापूर्वी १९७७ च्या जनता लाटेत व तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळचे राजापूरचे खासदार प्रा. मधु दंडवते हे रेल्वेमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रातून प्रदीर्घ काळानंतर रेल्वेमंत्री म्हणून काम करण्याची संधी सुरेश प्रभू यांना लाभली आहे.प्रा. दंडवते त्यांच्या कारकिर्दीत कोकण रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी चालना देताना वाटचाल सुरु केली होती. त्यानंतर १९८८च्या विश्वनाथ प्रतापसिंह मंत्रिमंडळात दंडवते हे अर्थमंत्री, तर ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाल्यानंतर कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना झाली. कालांतराने कोकणात रेल्वे आणण्याचे स्वप्न सत्यात उतरले होते. त्यानंतर मागील दीड दशकाच्या कालखंडात कोकण रेल्वेच्या समस्यांचे निराकरण होण्याऐवजी त्यात अधकिच भर पडत गेली. दुर्दैवाने त्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे वरच्यावर रेल्वेला अपघात होऊन जीवितहानी व वित्तहानीसारखे प्रकार वाढत आहेत. रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्रश्न कायम आहे. या समस्या मागील अनेक वर्षांपासूनच्या राहिल्या आहेत.राजापूरसारख्या दुर्गम तालुक्यासाठी सातत्याने मागणी हात असलेल्या सौंदळ स्थानकाचा प्रश्न अधांतरी आहे. त्यामुळे बहुसंख्य तालुकावासीयांना रेल्वेचा प्रवास समाधानकारकपणे करता येत नाही. यापूर्वीच्या रेल्वे अर्थसंकल्पात सुतोवाच केलेल्या कोल्हापूर-राजापूर या नियोजित रेल्वे मार्गाबाबत अजूनही निश्चिती झालेली नाही. इथल्या शेतकरी बांधवांनी आपल्या बहुमूल्य जमिनी देऊनदेखील कोकणला रेल्वेकडून आजवर न्याय मिळालेला नाही. त्यामुळे रेल्वेसारखे मोठे वजनदार खाते सुरेश प्रभूंकडे आल्याने कोकण रेल्वेच्या समस्या आता मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त होत आहे.यापूर्वी शिवसेनेकडून केंद्रात उद्योग, खत, रसायन, वन पर्यावरण, ऊर्जा खात्याचे मंत्री व नद्या जोड प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून सुरेश प्रभूंनी आपली जबाबदारी बजावली होती. आता रेल्वे खात्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असून, देशातील सर्व विभागातील रेल्वेसह कोकण रेल्वेला ते न्याय देतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)