शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 10:50 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्यार वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थितीबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण, क्यार वादळाचा फटका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्यार वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.यावर्षी ह्यक्यारह्ण वादळाचा व अवकाळी पावसाचा फटका भातशेती व मच्छिमारी व्यवसायासह आंबा बागायतदारांना बसला. आॅक्टोबर ते नोव्हेंबर या पहिल्या टप्प्यात येणाºया मोहोरावर अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. या पहिल्या टप्प्यातील या मोहोरामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आंबा तयार होतो व बागायतदारांनाही चांगला दर मिळतो.मात्र, पावसाने बागायतदारांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे बागायतदार चिंतातूर आहेत. या वातावरणामुळे आंबा कलमांना पालवी येण्याची शक्यता जास्त असून बागायतदारांना आंब्याला मोहोर येण्यासाठी डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या टप्प्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र, तेसुद्धा थंडीवर अवलंबून आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी म्हणावी तशी थंडी पडत नसल्याने बागायतदार चिंताग्रस्त आहेत.भातशेती नुकसानी, मच्छिमारांची नुकसानी याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. त्याच प्रकारे आंबा नुकसानीची पाहणी करून बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आता आंबा बागायतदारांमधून होत आहे.ज्या आशेवर आंबा बागायतदार होते तोच अवकाळी पावसाने पहिल्या टप्प्यातील मोहोर न आल्याने बागायतदारांची पुरती निराशा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोर हा डिसेंबर-जानेवारी महिन्यात येतो. त्याचा आंबा एप्रिल-मे महिन्यात तयार होतो.हंगामाच्या शेवटी आंब्याचा दर गडगडत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसतो. तरीही दुसऱ्या टप्प्यातील मोहोराच्या प्रतीक्षेत बागायतदार आहे. मात्र, पडणाऱ्या थंडीवर सर्व अवलंबून आहे, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यासाठी आता वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.आम्हांला वाली कोण ?आंबा बागायतदारांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या नुकसानीतून सावरायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. आम्हांला कोणीच वाली नाही का? असा प्रश्न आंबा बागायतदारांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग