कणकवलीत मॅनेजरने घातला हॉटेल व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, ऑडिटमध्ये उघड झाला घोटाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:20 IST2026-02-06T12:19:45+5:302026-02-06T12:20:03+5:30

हॉटेलची चावी कामगाराकडे देऊन झाला पसार

Manager in Kankavali duped hotelier of lakhs scam revealed in audit | कणकवलीत मॅनेजरने घातला हॉटेल व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, ऑडिटमध्ये उघड झाला घोटाळा 

कणकवलीत मॅनेजरने घातला हॉटेल व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, ऑडिटमध्ये उघड झाला घोटाळा 

कणकवली : ज्याच्यावर हॉटेलची संपूर्ण धुरा सोपवली, त्यानेच मालकाच्या विश्वासाला तडा देत लाखोंचा डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार कणकवलीत उघडकीस आला आहे. हॉटेल व्यावसायिक गुरुनाथ दशरथ काळसेकर यांची सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी व्यवस्थापक तुषार नंदकुमार मसूरकर (रा. कलमठ) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सन २०१६ ते २०२५ या प्रदीर्घ कालावधीत हा अपहार सुरू होता.

दशरथ काळसेकर यांनी २००९ पासून तुषारला आपल्या बार व बिअर शॉपीचा व्यवस्थापक म्हणून ठेवले होते. बँकेचे व्यवहार आणि माल भरण्याची सर्व जबाबदारी त्याच्याकडे होती. मात्र, नुकत्याच झालेल्या ऑडिटमध्ये हा घोटाळा उघड झाला. बारच्या खात्यातून ६ लाख ५० हजार रुपये फोंडाघाट येथील एका व्यक्तीच्या खात्यावर परस्पर वळवण्यात आले होते. तसेच, तुषारने स्वतःच्या नावावर पिग्मी उघडली असून, त्याचे पैसेही तो बारच्या गल्ल्यातूनच भरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

ऑडिटमध्ये उडाली झोप

सीएकडे हिशोबाची कागदपत्रे तपासणीसाठी दिली असता, फोंडाघाट येथील एका अनोळखी खात्यावर मोठी रक्कम वर्ग झाल्याचे दिसले. चौकशीअंती मॅनेजरनेच हा डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले.

मॅनेजर झाला 'नॉट रीचेबल'

१८ डिसेंबर २०२५ रोजी कोणालाही न सांगता तुषार हॉटेलची चावी कामगाराकडे देऊन पसार झाला. तेव्हापासून त्याचा फोन बंद असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

मालकाचा डोळा चुकवून दररोज पिग्मीचे पैसे भरणे आणि ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे रक्कम हडप करणे, असा तुषारचा नित्यक्रम होता. अखेर संशय आल्याने काळसेकर यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यातील व्यावसायिक वर्गात खळबळ उडाली असून, नोकरांवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title : कणकवली में मैनेजर ने होटल मालिक को लगाया लाखों का चूना; घोटाला उजागर।

Web Summary : कणकवली में एक मैनेजर ने होटल मालिक को नौ सालों में 6.5 लाख रुपये का चूना लगाया। ऑडिट के दौरान धोखाधड़ी का पता चला, जिसमें अनाधिकृत हस्तांतरण और बार फंड का उपयोग करके पिग्मी खाते के भुगतान का खुलासा हुआ। मैनेजर फरार है, और पुलिस जांच कर रही है।

Web Title : Manager swindles hotel owner of lakhs in Kankavli; scam exposed.

Web Summary : A manager in Kankavli defrauded a hotel owner of ₹6.5 lakhs over nine years. The fraud was discovered during an audit, revealing unauthorized transfers and Pigmy account payments using bar funds. The manager is now absconding, and police are investigating.