शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मालवण शहर कचऱ्याच्या विळख्यात

By admin | Updated: July 5, 2015 01:17 IST

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न : नगरपालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी

सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण मालवण शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. अनेक दिवस जमा झालेला कचरा नगरपरिषदेकडून उचलला जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन जनतेचा प्रश्न सोडवावा. सुयोग्य नियोजनातून कचरा समस्येतून शहरवासियांना मुक्त करावे अशी मागणी होत आहे. गेले वर्षभर शहरवासीयांना कचऱ्याचा त्रास होत आहे. रस्ते भुयारी गटार योजनेच्या कामानंतर रखडल्याने तसेच गटार खोदाई पूर्ण न झाल्याने खड्डेमय व पाणी तुंबणाऱ्या या रस्त्यांचा नागरिकांना त्रास होत आहे. शहरातकचरा नगरपरिषदेकडून वेळेत उचलला न गेल्याने कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. कचरा न उचलल्याने मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे. नगरपरिषद शहरातील नागरिकांकडून वर्षाकाठी हजारो रुपयांची घरपट्टी वसूल करते. वीज, पाणी तसेच आरोग्याच्या सुविधा, डास फवारणी, घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधा सेवा पुरवणे पालिकेची जबाबदारी आहे. मात्र, या सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या नगरपालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कचरा साचल्याने डासांचे प्रमाणही वाढले असून संसर्गजन्य रोग पसरू शकतात. नागरिकांचे आरोग्य विचाराधीन ठेऊन पालिकेने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.