शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मौल्यवान जीवन सार्थकी बनवा

By admin | Updated: December 28, 2015 01:05 IST

का. हु. शेख : वेंगुर्ले येथे बाळासाहेब खर्डेकर स्मृतिदिन कार्यक्रमात मार्गदर्शन

वेंगुर्ले : बॅ. खर्डेकर हे कायदे पंडित, सत्यनिष्ठा व स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. ते स्वातंत्र्य हाच आत्मा मानत. गुलामगिरीत कोणालाही ठेवायचे नाही व आपणही राहायचे नाही असे म्हणत. बॅ. खर्डेकरांनी तन, मनाने हे महाविद्यालय एक शिक्षणाचे दालन म्हणून उभे केले. त्यांच्या कार्याचे चिंतन, मनन करून मूल्यमापन करणे गरजेचे आहे. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे. आपले नशीब आपणच बनवा, कारण जीवन हे मौल्यवान आहे, असे आवाहन का. हु. शेख यांनी केले. बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे उद्घाटन शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर बी. के. सी. असोसिएशनचे सतीश डुबळे, स्थानिक सल्लागार समितीचे सुरेंद्र खामकर, नगरसेवक रमण वायंगणकर, स्मृतिदिन कार्यक्रमाचे चेअरमन प्रा. एस. जे. कदम उपस्थित होते.यावेळी मोहन होडावडेकर यांची मुंबई विद्यापीठ सर्वंकष परीप्रेक्ष्य नियोजन समिती सदस्य म्हणून नेमणूक झाल्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन त्यांचा प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी सन्मान केला. कर्तव्याची जाणीव व मायेची उब देणारा हा माझा सत्कार आहे. बॅ. खर्डेकर यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. त्यांनी सौंदर्याला नवीन दृष्टीने पाहिले. विद्यार्थ्यांनो, जगाची गती फार आहे. डोळे उघडे करून पहा, समाजसेवा करत स्वयंरोजगार प्रकल्प उभा करा, असे होडावडेकर यांनी सत्कारप्रसंगी सांगितले.इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या समृद्धी पेडणेकर हिला मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह ढाल, प्रमाणपत्र व इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, बक्षिसे देऊन गौरविले. कार्यक्रमाला यूथ संस्था अध्यक्ष श्रीनिवास गावडे, कलावलयचे रमेश नार्वेकर, ए. बी. आळवे, नंदन वेंगुर्लेकर, जयराम वायंगणकर, प्रा. सिद्धार्थ फडतरे, प्रा. वीरेंद्र देसाई, सुरेंद्र चव्हाण, ए. एम. सावळे, प्रा. संजीव चमणकर, प्रा. एस. टी. भेंडवडे, डॉ. एम. एम. मुजुमदार, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. वामन गावडे, पाहुण्यांचा परिचय प्रा. पी. डी. होडावडेकर, स्वागत प्राचार्य विलास देऊलकर यांनी केले. कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. ए. एम. माने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)