शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

Maharashtra Election 2019: महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन करणार; नारायण राणेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 4:34 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 ऑक्टोबरला नितेश राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत येणार

सावंतवाडी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 ऑक्टोबरला नितेश राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत येणार असून, त्यादिवशीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडीत केली आहे. विलीनीकरणानंतर भाजप ज्या ठिकाणी मला सभेसाठी पाठवेल तिथे जाऊन मी सभा घेईन, असे राणे यांनी सांगितले. कणकवलीतील युती तुटण्याला सर्वस्वी शिवसेना जबाबदार असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.

एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक उजवे हात  मानले जाणारे माजी आमदार राजन तेली यांनी पाच वर्षापूर्वी राणे पासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पाच वर्षानंतर सिंधुदुर्गचे राजकारण  बदलले असून, राणे यांनीही काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये दीपक केसरकर यांनी विजय मिळवलेला आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीमधून तर 2014 मध्ये शिवसेनेमधून ते विधानसभेत पोहोचले होते. यावेळी दीपक केसरकर यांच्यासमोर राजन तेली आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आव्हान आहे. मात्र मुख्य लढत ही केसरकरविरुद्ध तेली अशीच होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना भक्कम स्थितीत आहेत. गेल्या निवडणुकीत केसरकर यांनी या मतदारसंघात भाजपा उमेदवार असलेल्या तेलींचा 40 हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला सुमारे 29 हजार मतांची आघाडी मिळाली होती.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sawantwadi-acसावंतवाडी