शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

Maharashtra Elections 2019 : कणकवलीत राणेंची प्रतिष्ठा पणाला; शिवसेना-भाजपमध्येच होणार चुरशीच्या लढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:15 IST

नारायण राणे यांचे सुपुत्र माजी आमदार नीतेश राणे यांना रोखण्यासाठी शिवसेनेने राणेंचेच समर्थक सतीश सावंत यांना उमेदवारी दिल्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळणार आहे.

- महेश सरनाईकसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या लढती या राज्यातील सत्ताधारी शिवसेना विरूद्ध भाजप या दोन पक्षांमध्येच होणार आहेत. जागा वाटपात भाजपाच्या वाट्याला आलेल्या कणकवली मतदारसंघात शिवसेनेने अधिकृत उमेदवार उभा केल्याने शिवसेना आणि भाजप युतीमध्ये फूट पडली आहे.नारायण राणे यांचे सुपुत्र माजी आमदार नीतेश राणे यांना रोखण्यासाठी शिवसेनेने राणेंचेच समर्थक सतीश सावंत यांना उमेदवारी दिल्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळणार आहे. तर दोन वेळा आमदार झालेल्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची हॅट्ट्रिक हुकविण्यासाठी भाजप बंडखोर प्रदेश चिटणीस राजन तेली आणि केसरकर यांचे समर्थक असलेल्या बबन साळगावकर यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी दाखल केल्याने सावंतवाडीतील लढाई आता तिरंगी आणि चुरशीची बनली आहे. दीपक केसरकरांसाठी लावण्यात आलेल्या चक्रव्यूहात ते फसतात की विजयाची पताका फडकवितात, याकडे सर्व जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.कणकवली मतदारसंघात काँग्रेसकडून आमदारकीची पहिली टर्म पूर्ण करणाºया नीतेश राणेंनी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली. या निवडणुकीत नारायण राणे प्रत्यक्षात उमेदवार नसले तरी त्यांच्या चिरंजीवांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने युतीचा धर्म बाजूला सारत राणेंचे समर्थक जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारीही दिली आहे. त्यामुळे राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. वाटेल ते झाले तरी राणेंचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. या लढाईत राणेंसोबत आता भाजपाही असल्याने राणे-भाजपा विरूद्ध शिवसेना अशी लढाई होणार आहे. तर कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक आणि अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे. केवळ सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादीने बबन साळगावकर यांना उमेदवारी देऊन रंगत आणली आहे. तर कणकवली आणि कुडाळ मतदारसंघात काँग्रेसने अगदी नावाला उमेदवार उभे केले असल्याने ते लढतीत मागे पडले आहेत.प्रचारातील चर्चेचे मुद्देकणकवली मतदारसंघात दोन्ही उमेदवार पक्षांतर केलेले असल्याने आणि एकमेकांचे सोबती असल्याने वैयक्तिक टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे.युती शासनाच्या कालावधीत गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री असताना केसरकर यांनी शासनाच्या निधीचा योग्य वापर न केल्याचा मुद्दा त्यांचे विरोधक मोठ्या प्रमाणावर प्रचारात घेणार आहेत.रखडलेले विमानतळ, पाटबंधारे प्रकल्प आणि तरुणांना रोजगार नसल्यामुळे होणारे स्थलांतर हादेखील प्रचारात प्रमुख मुद्दा असेल.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाBJPभाजपा