शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 05:12 IST

Laxmi Niwas Mittal: ब्रिटनमधील नव्या सरकारने श्रीमंतांसाठी कडक कर धोरण आणल्यानंतर भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल ब्रिटन सोडून दुबईत राहण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मित्तल यांचे कर-निवासस्थान सध्या स्वीत्झर्लंडमध्ये आहे; पण पुढे ते जास्त वेळ दुबईत घालवणार आहेत.

लंडन - ब्रिटनमधील नव्या सरकारने श्रीमंतांसाठी कडक कर धोरण आणल्यानंतर भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल ब्रिटन सोडून दुबईत राहण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मित्तल यांचे कर-निवासस्थान सध्या स्वीत्झर्लंडमध्ये आहे; पण पुढे ते जास्त वेळ दुबईत घालवणार आहेत.

मित्तल यांच्या टीमने याबाबत अधिक माहिती दिली नसली तरी या निर्णयामागील एक प्रमुख कारण म्हणजे ब्रिटनचा नॉन-डोमिसाइल्ड (नॉन-डोम) कर दर्जा रद्द करणे असल्याचे बोलले जाते. ही सवलत असल्याने श्रीमंतांना फक्त ब्रिटनमध्ये कमावलेल्या उत्पन्नावर कर भरावा लागत असे. २६ नोव्हेंबरला अर्थसंकल्पात हा ‘सुपर रिच टॅक्स’ मंजूर होण्याची शक्यता आहे. स्थानिक माध्यमांनुसार, ब्रिटन सोडणाऱ्या व्यक्तींना २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर द्यावा लागू शकतो. नव्या कर धोरणामुळे ब्रिटन आता गुंतवणूक आणि संपत्ती वाढवण्यासाठी पूर्वीसारखे आकर्षक राहत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)

चिंता काय?
लक्ष्मी मित्तल यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची चिंता वारसा कर आहे. वारसा कर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता वारसांना देताना लावला जाणारा कर. येथे ३२५,००० पाउंडपेक्षा जास्त संपत्तीवर ४०% कर लागू शकतो. दुबई व स्वीत्झर्लंडमध्ये हा वारसा कर नाही. यामुळे मित्तल आता दुबईस प्राधान्य देत आहेत. मित्तल यांचे दुबईच्या एमीरेट्स हिल्स या सर्वात महागड्या भागात आलिशान महाल आहे. त्यांनी दुबईतील रिअल इस्टेट प्रकल्पांत गुंतवणूक केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lakshmi Mittal Leaving Britain Due to New Tax Policies

Web Summary : Indian industrialist Lakshmi Mittal is reportedly leaving Britain for Dubai due to stricter tax policies for the wealthy. The abolition of the non-domicile tax status and potential inheritance tax concerns are key factors. Mittal already owns property and investments in Dubai.
टॅग्स :businessव्यवसायEnglandइंग्लंडUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती