शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभाध्यक्षांनी जपल्या माहेरच्या आठवणी

By admin | Updated: January 10, 2015 00:23 IST

सुमित्रा महाजन : सर्वोच्च पदावरील निवडीनंतर प्रथमच चिपळूणला भेट

चिपळूण : लोकसभेच्या अध्यक्षा व मालघर - चिपळूणच्या सुकन्या असणाऱ्या सुमित्रा महाजन यांनी आज (शुक्रवारी) सकाळी शहरातील विविध मंदिरात जाऊन देवदेवतांचे दर्शन घेतले. लोकसभेच्या अध्यक्ष झाल्यानंतर सुमित्रा महाजन आज प्रथमच आपल्या माहेरी लोटिस्माच्या शतायु ग्रंथालये व ग्रंथकार अधिवेशन कार्यक्रमासाठी चिपळूण येथे आल्या आहेत. हेलिकॉप्टरने त्यांचे पवन तलाव मैदानावर आगमन झाल्यानंतर नगराध्यक्षा सावित्री होमकळस, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, आदिती देशपांडे, बरकत वांगडे, सुचय रेडीज, राजू कदम व निर्मला चिंगळे, भाजपचे नेते माधव गवळी, सरोज नेने, लोटिस्माचे अध्यक्ष अरविंद जाधव, लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, कार्यवाह बापू काणे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी महाजन यांचे स्वागत केले. त्यानंतर त्या कार्याध्यक्ष देशपांडे यांच्या निवासस्थानी गेल्या. तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथे चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर अध्यक्षा महाजन यांनी ग्रामदेवता भैरी जोगेश्वरी, लक्ष्मी केशव मंदिर, राऊत आळीतील गणपती मंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या चिपळुणातील शासकीय विश्रामगृहात गेल्या. शासकीय विश्रामगृहाबाहेर पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, तहसीलदार वृषाली पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, जिल्हाप्रमुख सचिन कदम, बाळा कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, राजू देवळेकर, माधवी पोटे, सुरेखा खेराडे आदींनी त्यांचे स्वागत केले.सायंकाळी महाजन यांनी ग्रंथनगरीला भेट दिली व देव विरेश्वर मंदिरात जाऊन विरेश्वराचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)जुनी मैत्रिण भेटली अन्...चिपळूणच्या सरोज नेने या महाजन यांच्या बालमैत्रिण. त्यांच्या भेटीत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.