शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी धरणात मुबलक पाणीसाठा

By admin | Updated: September 26, 2015 00:15 IST

प्रकल्प अधिकाऱ्यांची माहिती : कोनाळ कालव्याच्या मुख्य गेटचे दोन दरवाजे उघडले

कसई दोडामार्ग : चालू वर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने तिलारी मुख्य धरणात या वर्षी मुबलक पाणीसाठी होणार की नाही? अशी साशंकता निर्माण झाली होती. मात्र पावसाचे प्रमाण जरी क मी असले, तरी या धरणात आवश्यक पाणीसाठा झालेला आहे. १२.७० टिएमसी पाणीसाठा सद्यस्थितीत असून कोनाळ पुच्छ कालव्याच्या मुख्य गेटचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. ३१ आॅक्टोबरपर्यंत या धरणात स्थिर पाणीसाठा (१३.२० टिएमसी) होणार आहे, अशी तिलारी प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचा संयुक्त असा तिलारी प्रकल्प आहे. या तिलारी प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण झाल्यापासून या धरणात मुबलक पाणीसाठा साठविला जात आहे. या धरणातील पाणी गोवा राज्याला तसेच तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांना पुरविला जात आहे. तर याच पाण्याचा वापर कोनाळ महालक्ष्मी केंद्राला केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात या धरणात स्थीर पाणीसाठा साठवला जाऊन अतिरिक्त पाणी कोनाळ कालव्याच्या मुख्य गेटचे दरवाजे उघडे करुन तिलारी नदीत सोडले जाते. ३० जुलैपर्यंत ह्या धरणात पाणीसाठा होत असतो व ३१ जुलैला सर्व वक्रद्वारे बंद केली जात असून धरणातील अतिरिक्त पाणीसाठा ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडत असते. मात्र, यावर्षी निसर्गाच्या वातावरणात पूर्णत: बदल झाल्याने खुपच कमी प्रमाणात पाऊस कोसळला. तुरळक पडत असलेल्या पावसामुळे तिलारी धरणात पाणीसाठा होणार का? अशी एकप्रकारे या धरणातील पाण्यावर विसंबून असलेल्या गोवा व तालुक्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे धरण पाण्याने भरुन ओसंडून वाहत असे. मात्र यावर्षी सप्टेंबर महिना उजाडला तरी पावसाने काही जोर धरला नाही. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने भितीचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये पसरले होते. मात्र, गेल्या १५ तारखेपासून चार दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने धरण भरण्याची चिंता मिटली. सध्या या धरणात १२.७० टिएमसी एवढा पाणीसाठा आहे. कोनाळ पुच्छ कालव्याने मुख्य गेटच्या चार दरवाजांपैकी पहिला व चौथा वक्रद्वार ५ सेमींनी उघडे करण्यात आले असून ४.३८ घ.सें.मी. पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही दरवाजांचे मिळून ८.७४ घ.से.मी. एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच या धरणाच्या पाण्याचा वापर महालक्ष्मी विज निर्मिती केंद्राला चोवीस तास वापरावयास सुरू आहे. ३१ आॅक्टोबर अखेर या धरणातील पाणीसाठा स्थिर होईल अशी माहीती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)सुटकेचा नि:श्वासएकंदरीत यंदा धरण भरणार की नाही? मुबलक पाणी मिळणार की नाही? हे भेडसावनारे प्रश्न आता निकालात निघले असून दरवर्षी प्रमाणेच यंदाही नेहमीच्या वेळेत कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येईल, असे तिलारी प्रकल्पाच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी पुरवठ्याबाबत सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.