शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या पाठलागाने बिबट्या झाडावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 23:45 IST

सावंतवाडी : कारिवडे-गवळीवाडा येथे भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा चक्क कुत्र्यांनी पाठलाग करताच बिबट्या थेट नारळाच्या झाडावर (माडावर) चढून जाऊन ...

सावंतवाडी : कारिवडे-गवळीवाडा येथे भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा चक्क कुत्र्यांनी पाठलाग करताच बिबट्या थेट नारळाच्या झाडावर (माडावर) चढून जाऊन बसला. बराच वेळ कुत्रे खाली भुंकत होते. मात्र बिबट्या वर जाऊन बसल्याने अखेर कुत्रे निघून गेले पण बिबट्या बराच वेळ खाली येत नव्हता. अखेर त्याला एका काठीने ठोकरण्यात आल्यानंतर त्याने खाली उडी घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्यावेळी ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.कुत्रे आज जास्त भुंकतात याचे कारण काय? हे बघण्यासाठी भालेकर हे घराच्या मागे आले असता कुत्रे तोंड वर करून भुंकत होते. त्यामुळे त्यांनी वर बघितले असता नारळाच्या झाडात बिबट्याचे शेपूट दिसले. त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी लागलीच वनविभागाचे एक पथक कारिवडे गवळीवाडा येथे रवाना केले. तोपर्यंत बिबट्या झाडावरच होता.मात्र, कुत्रे भुंकण्याचे थोडे कमी झाले होते. त्यामुळे बिबट्याने पण सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण तो खाली येत नव्हता.अखेर ग्रामस्थ व वनविभागाने या बिबट्याला काठीने ठोेकरण्याचा प्रयत्न केला. साधारणत: १५ फूटावर हा बिबट्या असल्याने काठीने त्याला ठोकरने सोपे झाले. त्यामुळे बिबट्याने माडावरून उडी मारत जंगलात पळ काढला. बिबटा माडावरून उडी मारत असतानाच अनेकजण घाबरून गेले होते. जर बिबट्या उलटा आपल्या दिशेने आला तर काय? होईल अशी भिती होती पण बिबट्याने जंगलात जाणे पसंत केले.बिबट्याचा कुत्र्यांना चकवाकारिवडे गवळीवाडा येथे गेले काही दिवस बिबट्याचा वावर होता. मात्र शुक्रवारी सकाळी बिबट्या भक्ष्याच्या शोधात लक्ष्मण भालेकर यांच्या घराच्या परिसरात आला होता. पण पहाटेची वेळ असल्याने त्याला तसे काही मिळाले नाही. मात्र या भागात मोठ्या प्रमाणात कुत्रे असल्याने त्यांनी बिबट्याला बघताच बिबट्याचा पाठलाग केला. कुत्र्याचा जमाव असल्याने आपणास भक्ष्य बनवतील या भितीने बिबट्याने कुत्र्यांना चकवा देत चक्क भालेकर यांच्याच नारळाच्या झाडावर चढून बसणे पसंत केले. मात्र कुत्र्यांनी खाली भुंकणे सुरूच ठेवले होते.