शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशाळा आता पाणीपुरवठ्याकड

By admin | Updated: December 29, 2014 00:02 IST

जिल्हा परिषद : अहवाल उशिरा येऊ लागल्याने आरोग्य विभागाकडील काम काढले..

रहिम दलाल - रत्नागिरी -ग्रामीण भागाच्या गावातील पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येतात़ त्याचे अहवाल आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतून उशिरा येऊ लागल्याने दूषित पाण्यावर उपाययोजना करणे कठीण झाले़ त्यामुळे आता या प्रयोगशाळा आरोग्य विभागाकडून पाणी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या आहेत़ शासनाने या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच दि़ १ जानेवारी, २०१५ पासून करण्यात येणार आहे़ राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळणाऱ्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी या प्रयोगशाळांवर करण्यात येतो़ दरवर्षी हा निधी पाणी पुरवठा विभागाकडून आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात येतो़. शासनाच्या आरोग्य विभागाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पाण्यातून विषबाधा, साथीचे आजार पसरण्याच्या घटना वाढल्याने रत्नागिरी जिल्हावगळता राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागावर टीका होऊ लागली़ दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवते़ त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील विहिरी, बोअरवेल्सच्या पाण्याची पातळी तळ गाठते़ तरीही तेथील पाणी उपसा सुरु असतोच़ तेथील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा विभागाकडे असते़ आरोग्य विभागाचे कर्मचारी ग्रामीण भागातील गावामध्ये फिरुन प्रत्येक महिन्याला पाणी नमुने गोळा करतात़ ते नमुने पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी देतात़ त्याचा अहवाल जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे आल्यानंतर दूषित पाणी नमूने आढलेल्या त्या-त्या ग्रामपंचायतींना पाणी शुध्दिकरणाच्या सूचना दिल्या जातात़ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाण्याच्या माध्यमातून साथीचे आजार पसरण्याची गेल्या वर्षभरात एकही घटना घडलेली नाही़ मात्र, राज्याच्या इतर काही जिल्ह्यांमध्ये दूषित पाण्यातून साथींचे आजार पसरण्याच्या घटना घडत असतात़ औद्योगिकीकरणामुळे नद्या, तलाव, जलस्त्रोत दूषित होण्याचे घटना वाढत आहेत़ यातील पाणी नमुने तपासणीचे काम वेळेवर करण्यात येत नसल्याने प्रदूषणाबाबत आरडाओरड सुरु असते़ जिल्ह्यात रत्नागिरीत जिल्हास्तरीय आणि ४ उपविभागीय प्रयोगशाळा अशा एकूण ५ पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आहेत़ या प्रयोगशाळांसह तेथील कर्मचारीवर्ग आणि साधनसामुग्री दि़ १ जानेवारी, २०१५ पासून एकाच छत्राखाली आणून पाणी पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत़ पाणीपुरवठा विभागाकडे या प्रयोगशाळा वर्ग झाल्याने दूषित पाण्यांचे नमुने सिध्द झाल्यानंतर त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची प्रक्रिया काही कालावधीतच पूर्ण करणे सोपे होणार आहे.तपासणी प्रयोगशाळाजिल्ह्यामध्ये आजघडीला खालीलप्रमाणे पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आहेत़ रत्नागिरी- जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, रत्नागिरी़, मंडणगड- उपविभागीय प्रयोगशाळा, ग्रामीण रुग्णालय, भिंगळोली.दापोली- उपविभागीय प्रयोगशाळाग्रामीण रुग्णालय, दापोली़, चिपळूण- उपविभागीय प्रयोगशाळाग्रामीण रुग्णालय, कामथे़,लांजा- उपविभागीय प्रयोगशाळा, ग्रामीण रुग्णालय, लांजा़ ३ टक्के निधी प्रयोगशाळांवर खर्चीराष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळणाऱ्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी या प्रयोगशाळांवर खर्च करण्यात येतो़ दरवर्षी हा निधी पाणी पुरवठा विभागाकडून आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात येतो़